प्रारूप प्रभागरचना व आरक्षणावर गुरुवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:15+5:302021-01-20T04:25:15+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना व आरक्षणावर मागविलेल्या हरकती व सूचनांवर गुरुवारी सुनावणी ...

प्रारूप प्रभागरचना व आरक्षणावर गुरुवारी सुनावणी
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना व आरक्षणावर मागविलेल्या हरकती व सूचनांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
महानगरपालिकेने ताराबाई पार्क मुख्य निवडणूक कार्यालय येथे गुरुवारी (दि. २१) रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत प्रभागरचना यावर तसेच दुपारी २ ते ४.४५ या वेळेत प्रभाग आरक्षण हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्याचे नियोजन केले आहे. तसेच संबंधित हरकतदार यांना लेखी पत्राद्वारे तारीख व वेळ कळविण्यात आली आहे.
आरक्षणावर ३० तक्रारी तर प्रारूप प्रभागरचनांवर ३० तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. याबाबतचा अहवाल महापालिकेने राज्य निवडणूक आयोगास सादर केला आहे. सदर सुनावणीकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून साखर आयुक्त पुणे शेखर गायकवाड यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयाकडील उपायुक्त संतोष पाटील व राज्य निवडणूक आयोगाकडील उपायुक्त अविनाश सनस व अव्वर सचिव अतुल जाधव यांच्यासमोर प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्यासमवेत सुनावणी होणार आहे.