शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य योजना अडकली खाबुगिरीत : रुग्णांची होत आहे राजरोस लूट; मूळ हेतूलाच हरताळ

By admin | Updated: August 25, 2014 00:20 IST

‘प्राथमिक कागदपत्रे न पाहताच हे योजनेत बसत नाही’ असे सांगत ‘हबकी’ डाव टाकून पैसे उकळण्यासाठी पहिला फासा टाकला जातो आणि येथूनच एजंटगिरीचा श्रीगणेश होतो.

संतोष पाटील - कोल्हापूर -‘साहेब... राजीव गांधी योजनेतनं आॅपरेशन करायचं हाय, व्हईल न्हवं?’ अशी मोठ्या आशेने व करुण स्वरात दररोज शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक आर्त विनविण्या करीत जीवनदायी योजनेच्या ‘आरोग्य मित्रा’कडे उपचाराचे साकडे घालतात. विनवणी करणारा याचक अन् आपण दाता असल्याच्या भूमिकेतून रुग्णांना माहिती दिली जाते. ‘प्राथमिक कागदपत्रे न पाहताच हे योजनेत बसत नाही’ असे सांगत ‘हबकी’ डाव टाकून पैसे उकळण्यासाठी पहिला फासा टाकला जातो आणि येथूनच एजंटगिरीचा श्रीगणेश होतो. आरोग्यपूर्ण जीवनाची हमी देणाऱ्या योजनेचा मुळापासूनच पुनर्आढावा घेण्यासारखीच सद्य:स्थिती आहे. एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेकडे काही रुग्णालये वरकमाईचे साधन म्हणून पाहू लागली आहेत. योजनेत दीड लाखापर्यंतच्या ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांत मोफत केल्या जातात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असणाऱ्या या योजनेला खाबुगिरीने पोखरल्याची सद्य:स्थिती आहे. (क्रमश:)एक लाखापेक्षा कमी एकत्रित वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे, तसेच पांढरे शिधापत्रिकाधारक वगळता सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थी कुटुंबांना विशेष ओळखपत्र देऊन लाभार्थी ठरविण्यात येते. या योजनेत जिल्ह्यातील २६ लाखांहून अधिक नागरिक पात्र आहेत. मात्र, योजनेची मूळ माहिती व गांभीर्य नसल्यानेच ही योजना केवळ कागद रंगवून पैसे खाण्याचे कुरण बनली आहे.या योजनेत सर्व शासकीय, खासगी तसेच धर्मादाय संस्था रुग्णालयांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील २८ मोजकी रुग्णालये या योजनेत सहभागी आहेत. तसेच लाभार्थ्याला त्याच्या मर्जीनुसार नोंदविलेल्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा आहे. हर्निया, डायलेसिस, कर्करोग, मेंदूचे विकार, मूतखडा, बायपास, हृदय शस्त्रक्रिया, हाडांचे प्रत्यारोपण, अपघातातील दुखापत, आतड्यांचे विकार आदी ९७२ आजार व त्याच प्रकारांच्या शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा लाभ घेता येतो.या योजनेतील लाभार्थ्यांचा ३६८ रुपयांचा विम्याचा हप्ता शासनातर्फे भरला जातो. लाभार्र्थ्यांंना प्रतिवर्षी दीड लाखापर्यंतचे विमा संरक्षण तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २ लाख ५० हजारांपर्यंत मर्यादा आहे. कुटुंबातील व्यक्तीसाठी एका वर्षासाठी या योजनेचा लाभ घेता येतो.