शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: घरोघरी फिरून २० रुपयांत आरोग्य तपासणी; इचलकरंजीत सहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:04 IST

महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

इचलकरंजी : कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना रत्नोत्रय आयुर हेल्थ केअर उचगाव (ता. करवीर, जि. कोल्हापूर) या नावाने नागरिकांची आरोग्य तपासणी व औषध विक्री करणाऱ्या तीन महिलांसह सहा जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार इचलकरंजी येथील पि. बा. पाटील मळ्यात सुरू होता. महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.गणेश शशिकांत बारटक्के (रा. मोरेवाडीनगर), रवीराज रामचंद्र कवाळे (रा. राजारामपुरी पहिली गल्ली), तेजस विरुपाक्ष जंगम (रा. वाशी नाका), वनिता अशोक पोवार (रा. टेंबलाईवाडी), तंझीला तौफिक रुंकडी, सायली शुभम पाटील (दोघी रा. उचगाव, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोग्य सल्लागारांची नावे आहेत.पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी, पि. बा. पाटील मळ्यात सोमवारी पाच ते सहा जण घरोघरी जाऊन महापालिकेकडून आलो आहोत, असे सांगून रत्नोत्रय आयुर हेल्थ केअर उचगाव अशा मजकुराची २० रुपये किमतीची आरोग्य तपासणीची पावती देऊन काही यंत्राद्वारे महिलांची तपासणी करीत होते तसेच औषधेही देत होते. याची माहिती महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. संगेवार व पथकाने येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी संशयित गणेश बारटक्के, रवीराज कवाळे, तेजस जंगम, वनिता पोवार, तंजिला रुकंडी, सायली पाटील आदी स्वत:चे ओळखपत्र गळ्यात अडकवून संस्थेच्या नावे २० रुपये किमतीची पावती देऊन रत्नलीव्ह सिरप, दिया अमृत, दिव्य आरोग्य, रत्न संजीवनी, रत्न फेम सिरप, नारी सखी सिरप, अधिररत्न सिरप, फेनेरील प्लस गोळ्या, त्रिफला गोळ्या, अधिरत्न गोळ्या, सुवर्णप्राश ड्रॉप, अर्थोरत्न टॅब्लेट अशी औषधे देत असल्याचे निदर्शनास आले. ज्यांची किंमत सुमारे ३ हजार ३१० रुपये होती. संशयितांकडे आरोग्य विभाग तसेच महापालिकेकडून कोणतेही प्रमाणपत्र किंवा आरोग्य तपासणीसाठी उचित पदवी नसल्याचेही निष्पन्न झाले. शासन प्राधिकृत वैद्यक परिषदेकडेही कोणतीही नोंदणी नसल्याने मानवी जीविताची सुरक्षितता धोक्यात येईल, असे कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पूनम माने करीत आहेत.