GokulMilk Election-हत्तरकींची उमेदवारी नक्की,इतरांना प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 06:50 PM2021-03-29T18:50:18+5:302021-03-29T18:53:18+5:30

GokulMilk Election Kolhapur- गोकुळच्या निवडणूकीत सत्ताधारीकडून माजी अध्यक्ष स्व.राजकुमार हत्तरकी यांच्या पत्नी रेखाताई किंवा त्यांच्या स्नुषा श्वेता सदानंद हत्तरकी यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून अप्पी पाटील व प्रकाश चव्हाण यांचेही जोरदार प्रयत्न आहेत. विरोधी आघाडीतील सतीश पाटील हे मुश्रीफांच्या तर विद्याधर गुरबे व सोमगोंडा आरबोळे हे सतेज पाटील यांच्या जवळचे आहेत. परंतु, इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे सर्वांनाच माघारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Hattaraki's candidature in Gokul's election is definitely waiting for others! | GokulMilk Election-हत्तरकींची उमेदवारी नक्की,इतरांना प्रतीक्षा!

GokulMilk Election-हत्तरकींची उमेदवारी नक्की,इतरांना प्रतीक्षा!

Next
ठळक मुद्देगोकुळच्या निवडणूकीत हत्तरकींची उमेदवारी नक्की,इतरांना प्रतीक्षा!गडहिंग्लज तालुक्यातील चित्र : गटा-तटांची मोट बांधताना नेत्यांची होणार दमछाक

राम मगदूम

गडहिंग्लज : गोकुळच्यानिवडणूकीत सत्ताधारीकडून माजी अध्यक्ष स्व.राजकुमार हत्तरकी यांच्या पत्नी रेखाताई किंवा त्यांच्या स्नुषा श्वेता सदानंद हत्तरकी यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून अप्पी पाटील व प्रकाश चव्हाण यांचेही जोरदार प्रयत्न आहेत. विरोधी आघाडीतील सतीश पाटील हे मुश्रीफांच्या तर विद्याधर गुरबे व सोमगोंडा आरबोळे हे सतेज पाटील यांच्या जवळचे आहेत. परंतु, इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे सर्वांनाच माघारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विद्यमान संचालक मंडळात गडहिंग्लज तालुक्याचा एकही प्रतिनिधी नाही. परंतु, यावेळी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने गटा-तटांची मोट बांधून ह्यताकदीह्णचा उमेदवार निवडतांना नेत्यांची दमछाक होणार आहे.

१९८० ते ८५ मध्ये बाळासाहेब पाटील - औरनाळकर हे संचालक होते. त्यावेळी त्यांनी गडहिंग्लजसह आजरा व चंदगडचेही प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९८५ पासून काँग्रेसचे राजकुमार हत्तरकी हे सलग २८ वर्षे संचालक होते. दरम्यान, दोनवेळा अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला. १९९० मध्ये ह्यगोकुळह्णचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गडहिंग्लज तालुक्याला दोन जागा दिल्या. त्यामुळे बाबासाहेब कुपेकर यांनी तानाजीराव मोकाशी यांना संधी दिली. हा अपवाद वगळता गडहिंग्लजकरांच्या वाटयाला नेहमी एकच जागा आहे.

'गडहिंग्लज'करांना हव्यात २ जागा

गडहिंग्लज तालुक्यात २७३ ठरावधारक गटा-गटात विभागल्यामुळे मतांच्या बेरजेसाठी किमान २/३ गट एकत्र आणायला हवेत. म्हणूनच, यावेळी दोन्ही आघाड्यांना गडहिंग्लजमध्ये दोन जागा देण्याशिवाय पर्याय नाही.

हे आहेत इच्छुक...

  • सत्ताधारी आघाडीकडून-राष्ट्रवादीचे रामराज कुपेकर, काँग्रेसचे सदानंद हत्तरकी,अप्पी पाटील, भाजपचे प्रकाश चव्हाण, संजय बटकडली
  • विरोधी आघाडीकडून - राष्ट्रवादीचे महाबळेश्वर चौगुले, सतीश पाटील, अभिजित पाटील, गंगाधर व्हसकोटी व सुरेखा बाबूराव चौगुले, काँग्रेसचे सुरेश कुराडे, सोमगोंडा आरबोळे, विद्याधर गुरबे, शिवसेनेचे बाळासाहेब कुपेकर, सिंधू पाटील


स्वाती कोरी कुणाकडून..? :
विधान परिषदेच्या सलग चारही निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना साथ दिलेल्या श्रीपतराव शिंदेंनी यावेळी पहिल्यांदाच कन्या स्वाती कोरी यांच्यासाठी विरोधी आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे. विधानसभेला त्यांनी मुश्रीफ व राजेश पाटील यांना मदत केली आहे. परंतु, यापूर्वी महाडिक यांनीही त्यांना शब्द दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या 'उमेदवारी'चीही उत्सुकता आहे.

Web Title: Hattaraki's candidature in Gokul's election is definitely waiting for others!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.