Kolhapur: हातकणंगलेत महिलेचा खून, घटनास्थळी पोलिस दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 17:02 IST2024-03-26T16:38:47+5:302024-03-26T17:02:11+5:30
दत्ता बिडकर हातकणंगले : हातकणंगले येथे तीन दिवसापूर्वी भाडयाच्या घरात राहायला आलेल्या रूपाली दादासो गावडे (रा. हिंगणगाव ता. हातकणंगले) ...

Kolhapur: हातकणंगलेत महिलेचा खून, घटनास्थळी पोलिस दाखल
दत्ता बिडकर
हातकणंगले : हातकणंगले येथे तीन दिवसापूर्वी भाडयाच्या घरात राहायला आलेल्या रूपाली दादासो गावडे (रा. हिंगणगाव ता. हातकणंगले) या महिलेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. खुनाची माहिती मिळताच हातकणंगले पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लश्मी इंडस्ट्रीज रोडला राजदिप खोत यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत प्रकाश हाभीमणी आणि रुपाली गावडे तीन दिवसापूर्वी राहायला आले होते. रूपाली आणि प्रकाश यांचे प्रेमसंबध होते. ते दोन -तीन वर्ष हिंगणगाव सोडून बाहेर राहत होते. रुपाली हीला दोन मूले असून तिचे माहेर बागणी ता. वाळवा आहे. ती प्रकाश बरोबर राहत होती.
मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. रूपालीच्या खूनानंतर प्रकाश फरारी आहे. हातकणंगले पोलीस ठाणेचे पो.हे.कॉ. महादेव खेडकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयामध्ये पाठविला. रूपालीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु असून घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात येणार आहे.