शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेतील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

By admin | Updated: December 19, 2014 00:20 IST

२१ ग्रामपंचायतींच्या वॉर्ड (प्रभाग) रचना कार्यक्रमाला गती आली आहे

दत्ता बीडकर - हातकणंगले -तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या मुदती जुलै २०१५ मध्ये संपत आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली. राखीव वॉर्डातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आल्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे. २१ ग्रामपंचायतींच्या वॉर्ड (प्रभाग) रचना कार्यक्रमाला गती आली आहे. तसेच तालुक्यातील ६२ गावांच्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १५ दिवसांत अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील कबनूर, चंदूर, जंगमवाडी, माणगाववाडी, माणगाव, तिळवणी, रूई, किणी, नेज, कुंभोज, दुर्गेवाडी, बिरदेववाडी, मिणचे, लाटवडे, खोची, वाठार तर्फ उदगांव, तासगांव, वाठार तर्फ वडगांव, पाडळी, आणि मनपाडळे या २१ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत जुलै, आॅगस्ट २०१५ मध्ये संपत आहे. निवडणुकीच्या अगोदर सहा महिने प्रभाग रचना सुरू केली जाते. त्याप्रमाणे प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे. प्रभाग रचनेवरील हरकती सुनावणीसाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता प्रभाग रचनेच्या कामामध्ये प्रशासन व्यस्त आहे. निवडणूक आयोगाने राखीव प्रभागांतून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली आहे. यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये जातप्रमाणपत्राचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. २१ ग्रामपंचायतींसाठी राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी २१ डिसेंबर ते ९ जानेवारी या कालावधीत आपले वैधता प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव तालुका कार्यालयाकडे सादर करण्याची मुदत आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत. पक्षापेक्षा ग्रामपातळीवरील आघाड्यांना महत्त्व दिले जात आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी बॅकफुटवर गेल्यामुळे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नवीन सरपंच आरक्षणाप्रमाणे पार पडणार आहेत. मात्र आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ४१ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत ही याच पंधरा दिवसांत जाहीर होणार असल्याने पुढील अडीच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकाचे सरपंचही याचवेळी निश्चित होणार आहेत.तालुक्यात सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यानंतर बाजार समिती, के.डी.सी.सी. आणि गोकुळबरोबर पंचगंगा साखर कारखाना निवडणुका मे २०१५ अखेर होणार असल्याने सहा महिने तालुक्यात निवडणुकीचे वारे आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे आपोआप तयार होत आहे.