शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य ...

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक असल्याची अट आहे. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी ‘रिॲलिटी चेक’ केले असता, त्यामध्ये शहरातील विविध हॉटेल्समध्ये कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांवरील बहुतांश कर्मचाऱ्यांचा लसीचा पहिला डोस झाला आहे. पण १८ ते ४४ वयोगटातील कर्मचारी हे लस उपलब्धतेच्या प्रतीक्षेत आहेत, असे दिसून आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना बहुतांश हॉटेल्स, उपाहारगृहांमध्ये पार्सल सेवा सुरू होती. शासनाने दि. १५ ऑगस्टपासून या हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स, उपाहारगृहांना ५० टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंत सेवा देण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार कोल्हापूरमध्ये सध्या सेवा सुरू आहे. हॉटेल क्षेत्रातील बहुतांश कर्मचारी हे १८ ते ४४ वयोगटामधील आहेत. त्यांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

पॉईंटर

शहरातील हॉटेल्सची संख्या : १५००

जिल्ह्यातील हॉटेल्सची संख्या : ३७००

सध्या सुरू झालेल्या हॉटेल्सची संख्या : ३३००

कर्मचाऱ्यांची एकूण संख्या : सुमारे २५ हजार

काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी!

१) लक्ष्मीपुरीतील एका हॉटेलमध्ये १८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील ४५ वर्षांवरील ५० टक्के कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस, तर उर्वरित ४४ वयोगटातील कर्मचाऱ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.

२) राजारामपुरी दुसरी गल्ली येथील एका हॉटेलमध्ये एकूण २५ कर्मचारी असून त्यामधील १६ जणांचे दोन्ही, तर अन्य ९ कर्मचाऱ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.

रस्त्यांवरील टपऱ्यांवर आनंदीआनंद

शहरातील विविध परिसरातील चौक, रस्त्यांना लागून चहाच्या टपऱ्या, स्टॉल्स आहेत. तेथील ४५ वर्षांवरील बहुतांश मालकांचे लसीकरण केले आहे. ४४ वर्षांपर्यंतच्या काही कर्मचाऱ्यांचा पहिला डोस झाला असून काहीजण डोसच्या प्रतीक्षेत आहेत. हे कर्मचारी संघटित नसल्याने त्यांचे लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

प्रतिक्रिया...

कोल्हापूर शहरातील सुमारे १३०० हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू केली आहेत. हॉटेल्समध्ये कार्यरत असणारे बहुतांश कर्मचारी १८ ते ४४ वयोगटातील आहेत. त्यातील पहिला डोस झालेल्यांचे प्रमाण कमी आहे. ४५ वर्षांवरील बहुतांश कर्मचाऱ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी महापालिका, जिल्हा प्रशासनाकडे आम्ही करणार आहोत.

- उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ.