शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गायन आणि बासरी वादन अशा अनोख्या जुगलबंदीत सोमवारी बासरी युगप्रवर्तक प्रसिद्ध पंडित पन्नालाल घोष ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : गायन आणि बासरी वादन अशा अनोख्या जुगलबंदीत सोमवारी बासरी युगप्रवर्तक प्रसिद्ध पंडित पन्नालाल घोष स्मृती संमेलन बहरले. भोपाळचे प्रसिद्ध बासरीवादक पंडित अभय फगरे यांना यंदाच्या पंडित पन्नालाल घोष स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध बासरीवादक नित्यानंद हळदीपूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. देवल क्लबच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात साेमवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला.

पुरस्कारप्राप्त पंडित फगरे हे भोपाळ आकाशवाणीत कार्यरत असून, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, मोरोक्को, ब्राझील, न्यूझीलंड, आदी ठिकाणी त्यांच्या मैफली झाल्या आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर ते म्हणाले, युगप्रवर्तक बासरीवादक पन्नालाल घोष यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.

पुरस्कारानंतर बासरीवादक अनुपम वानखेडे व गायक सारंग फगरे यांच्यातील अनोखी जुगलबंदी रंगली. त्यांनी सुरुवातीला ‌राग बिहाग सादर केला. विलंबित एकताल व द्रुत त्रितालातील रचना सादर केल्यानंतर त्यांनी एक धून सादर केली. त्यानंतर पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या बासरीवादनाची मैफलही सजली. त्यांना गिरीधर कुलकर्णी, प्रशांत देसाई यांची तबला, तर योगेश तावडे यांची तानपुरा साथ दिली. प्रास्ताविक व आभार संयोजक प्रा. सचिन जगताप यांनी केले. बासरीचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी पंडितजींच्या नावे संगीत संमेलन व बासरी वादनाची मोफत शिबिरे आयोजित केली असल्याचे प्रा. जगताप यांनी आवर्जून सांगितले. यावेळी देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर उपस्थित होते. माधवी देशपांडे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम मोजक्याच रसिकांच्या उपस्थितीत झाला.

फोटो : २८१२२०२०-कोल-घोष पुरस्कार

ओळी : कोल्हापुरातील देवल क्लबच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात सोमवारी बासरीवादक पंडित अभय फगरे यांना पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या हस्ते पंडित पन्नालाल घोष स्मृतिगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्रीकांत डिग्रजकर, प्रा. सचिन जगताप उपस्थित होते. (छाया - आदित्य वेल्हाळ)