गडहिंग्लजमध्ये सेवानिवृत्त कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:40+5:302021-01-22T04:21:40+5:30

गडहिंग्लज : थकीत फायनल पेमेंट व ग्रॅच्युईटीच्या मागणीसाठी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून सेवानिवृत्त कामगारांनी गुरुवारी मूकफेरी ...

Half-naked agitation of retired workers in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये सेवानिवृत्त कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

गडहिंग्लजमध्ये सेवानिवृत्त कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

गडहिंग्लज : थकीत फायनल पेमेंट व ग्रॅच्युईटीच्या मागणीसाठी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून सेवानिवृत्त कामगारांनी गुरुवारी मूकफेरी काढून अर्धनग्न आंदोलन केले. याप्रश्नी त्वरित निर्णय न झाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे. येथील प्रांतकचेरीसमोर गेल्या आठ दिवसांपासून कामगारांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे कामगारांनी शहरातील मुख्य मार्गावरून हलगी व टाळांच्या निनादात विविध मागण्यांच्या घोषणा देत काढलेल्या अर्धनग्न फेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनप्रश्नी शासकीय स्तरावर तोडगा काढण्यासाठी कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत.

आंदोलनात चंद्रकांत बंदी, बाळासाहेब मोहिते, रणजीत देसाई, लक्ष्मण देवार्डे, सुभाष पाटील, बाळासाहेब निळपणकर, बाबू खोत, मारूती नवलाज आदींसह सेवानिवत्त कामगारांनी सहभाग घेतला आहे. -

फोटो ओळी : थकीत फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीच्या मागणीसाठी गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी शहरातून अर्धनग्न फेरी काढली. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : २१०१२०२१-गड-०४

Web Title: Half-naked agitation of retired workers in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.