शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

कोटीसाठी आडवा पाय, हजारांसाठी पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:20 IST

जिल्हा परिषदेला कोटीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या विश्रामगृहांच्या व्यवहारात आडवा पाय घालणारे काही सदस्य मालिकांच्या शुटिंगमधून मिळणाºया हजारांच्या रकमेसाठी मात्र पायघड्या घालत आहेत. उत्पन्न वाढावे, स्वनिधी वाढावा यासाठी गळे काढायचे आणि विश्रामगृहामध्ये स्वत:च्या सोईवर

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषद : विश्रामगृहाबाबत सदस्यांची दुटप्पी भूमिकाउत्पन्नापेक्षा सदस्यांची स्वत:ची सोय महत्त्वाची

नसिम सनदी ।कोल्हापूर : जिल्हा परिषदेला कोटीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या विश्रामगृहांच्या व्यवहारात आडवा पाय घालणारे काही सदस्य मालिकांच्या शुटिंगमधून मिळणाºया हजारांच्या रकमेसाठी मात्र पायघड्या घालत आहेत. उत्पन्न वाढावे, स्वनिधी वाढावा यासाठी गळे काढायचे आणि विश्रामगृहामध्ये स्वत:च्या सोईवर गंडांतर येतेय म्हटल्यास विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याने जि.परिषदेच्या स्वनिधी वाढविण्याच्या प्रयत्नाला खीळ बसत आहे.\

जिल्हा परिषदेची पन्हाळा, गगनबावडा, जोतिबा, गडहिंग्लज, इचलकरंजी, राधानगरी अशी सहा विश्रामगृहे मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या देखभालीवर वर्षाकाठी ३९ लाख ५३ हजार रुपये खर्च होतो. त्यातून उत्पन्न मात्र अवघे १ लाख ५३ हजार मिळते. मिळणाºया उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा ४० पटींनी जास्त आहे. हा खर्चाचा भार जिल्हा परिषदेच्या स्वनिधीवर पडतो. त्यामुळे सदस्यांना अन्य विकासकामांसाठी मिळणाºया निधीत मोठी कपात करावी लागली आहे. यापूर्वी सदस्यांना ११ ते १४ लाखांपर्यंत स्वनिधी मिळत होता. मात्र, आता अंदाजपत्रकच १४ कोटींपर्यंत खाली आल्याने अवघ्या सहा लाखांवर सदस्यांची बोळवण केली जात आहे.

या परिस्थितीत स्वनिधी वाढवण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या इमारतीचा विकास करण्याशिवाय पर्याय नाही. सध्याची आर्थिक स्थिती पाहता जिल्हा परिषदेला स्वत:च्या ताकदीवर विकास करणे शक्य नसल्याने भाडेतत्त्वासह बीओटीचा पर्याय स्वीकारला गेला आहे. त्यातून पन्हाळा, जोतिबा, गगनबावडा ही तीन विश्रामगृहे भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया झाली. पन्हाळा विश्रामगृहातून २० लाख ३२ हजार रुपये उत्पन्न गृहीत धरुन भाडेतत्वावर दिले गेले. त्यासाठी ठेकेदाराने ३० लाख रुपये खर्च करून त्याचे नूतनीकरणही करून घेतले. आता काही सदस्यांनी याला विरोध करीत हा व्यवहारच मोडावा असा आग्रह धरला आहे. पन्हाळ्याचा व्यवहार वादात अडकल्याने गगनबावडा व जोतिबा विश्रामगृहांच्या विकासाबाबत ठेकेदाराने नकार दर्शवला आहे. जोतिबा विश्रामगृहातून जिल्हा परिषदेला ६० लाख रुपये उत्पन्न मिळणार होते.विश्रामगृहांना विरोध करणारे सदस्य मात्र जिल्हा परिषदेचे मुख्यालय भाडेतत्त्वावर देण्याबाबत गप्प बसल्याचे दिसत आहे. मराठी चित्रपट मालिकांच्या दहा हजारांच्या भाड्यासाठी संपूर्ण इमारत भाड्याने दिली जात आहे. कोटीचे हमखास उत्पन्न मिळवून देणाºया विश्रामगृहांच्या विकासासाठी विरोध करणारे सदस्य याकडे मात्र कानाडोळा करताना दिसत आहेत. हजारांचे उत्पन्न मिळावे म्हणून धडपडणारे सदस्य विश्रामगृहातून मिळणाºया कोटींच्या उत्पन्नावर मात्र पाणी सोडावयास तयार झाले आहेत. ही विश्रामगृहे जिल्हा परिषदेनेच चालवावीत, असा विरोध करणाºया सदस्यांचा आग्रह आहे; पण आजवरचा अनुभव पाहता, जिल्हा परिषदेला ती व्यावसायिक पद्धतीने चालवणे शक्य झालेले नाही.स्वत:च्या सोईसाठी विरोधपन्हाळा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे येणाºयांची संख्या जास्त आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य पदाधिकाºयांना व त्यांच्याशी संबंधित लोकांचा विश्रामगृह मिळण्याचा कायमच आग्रह असतो. भाडेतत्त्वावर गेल्यास आपल्या स्वातंत्र्यावर गदा येईल, गैरसोय होईल, अशी भीती वाटत असल्याने काहींकडून त्याला विरोध होत असल्याची चर्चा आहे. 

कायदेतज्ज्ञांचा इशाराकाही सदस्यांच्या आग्रहास्तव विश्रामगृहांचा ठेका रद्द करून जिल्हा परिषदेने ताब्यात घेण्याची कार्यवाही केल्यास निविदाधारक कोर्टात दावा दाखल करण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेला कोर्ट कारवाईस व होणाºया नुकसानीस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या कायदेतज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदMONEYपैसा