Kolhapur: आजऱ्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; काजू, आंबा पिकांना धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:47 IST2025-04-08T15:45:10+5:302025-04-08T15:47:24+5:30

सदाशिव मोरे आजरा : आजऱ्यात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस आला. रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. सुमारे अर्धा तास ...

Hail rain with strong winds in aajra Kolhapur | Kolhapur: आजऱ्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; काजू, आंबा पिकांना धोका

Kolhapur: आजऱ्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; काजू, आंबा पिकांना धोका

सदाशिव मोरे

आजरा : आजऱ्यात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस आला. रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. सुमारे अर्धा तास गारांच्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. गारांच्या पावसामुळे काजू व आंबा उत्पादनावर परिणाम होणार आहे. गेली पंधरा दिवस आजऱ्यात प्रचंड उष्मा जाणवत होता.

गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणात बदल झाला आहे. बहुतांशी ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी उष्म्यात वाढ होत आहे. सकाळी उन्हाच्या झळा तर दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. वातावरणात उष्मा कमालीचा जाणवत आहे.

शेतीला पूरक..

वळीवाचा पाऊस शेतीला पूरक आहे. ऊसासह उन्हाळी भुईमूग, मक्यासाठी पाऊस चांगला आहे. वेलवर्गीय पिकांना या पावसाचा काहीसा फटका बसू शकतो.

Web Title: Hail rain with strong winds in aajra Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.