वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, मराठा आरक्षणप्रकरणावरुन कोल्हापुरात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 17:32 IST2022-04-12T17:31:04+5:302022-04-12T17:32:12+5:30
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते ...

वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, मराठा आरक्षणप्रकरणावरुन कोल्हापुरात तक्रार दाखल
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते यांची सध्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गिरगाव कोर्टाने त्यांची कोठडी आणखी २ दिवसांची वाढवली आहे. १३ एप्रिलपर्यंत त्यांची पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली आहे. असे असतानाच सदावर्ते यांच्याविरोधात सातारा, पुणे याठिकाणीही तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर आता कोल्हापुरातही सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.
अॅड. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी बेकायदेशीररित्या पैसा गोळा केला, असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांनी जमा केलेल्या पैशाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दिलीप पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.