Kolhapur: अतिक्रमण काढण्याच्या वादातून रोखली बंदूक, तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:41 IST2025-04-23T13:41:05+5:302025-04-23T13:41:21+5:30
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ले येथे मानेवाडी परिसरात अतिक्रमण काढण्याच्या वादातून ग्रामपंचायत सदस्यासोबत वाद घालून त्यांच्या नातेवाइकांवर बंदूक रोखण्याचा ...

Kolhapur: अतिक्रमण काढण्याच्या वादातून रोखली बंदूक, तिघांवर गुन्हा
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ले येथे मानेवाडी परिसरात अतिक्रमण काढण्याच्या वादातून ग्रामपंचायत सदस्यासोबत वाद घालून त्यांच्या नातेवाइकांवर बंदूक रोखण्याचा आणि कोयता घेऊन अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. शनिवारी (दि. १९) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या प्रकाराबद्दल सरिता भीमराव माने यांनी सोमवारी (दि. २१) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.
रणजित दत्तात्रय माने, उषा दत्तात्रय माने आणि दत्तात्रय कृष्णात माने (तिघे रा. केर्ले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अतिक्रमण काढताना ग्रामपंचायत सदस्य विक्रम माने हे उपस्थित होते. त्यांनीच अतिक्रमण काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून रणजित माने याने वादाला सुरुवात केली. शिवीगाळ करीत तो माने यांच्या अंगावर धावून गेला. त्याला वीट फेकून मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच दत्तात्रय माने हा कोयता घेऊन विक्रम यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. त्यानंतर काही वेळाने रणजित माने हा विकास माने यांच्या घरी बंदूक घेऊन गेला. कुठे आहे विक्रम..? त्याला ठारच मारतो, असे म्हणत त्याने बंदूक रोखून दहशत माजवली. या प्रकाराने केर्ले येथे खळबळ उडाली.