शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावची लढाई जिंकू शकेल एकगठ्ठा मराठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

निवडणूक आयोगाने जात, भाषा आणि इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवू नका, असे निर्बंध घातले तरी, स्वाभाविक सहकार्य आणि आपल्या माणसाला ...

निवडणूक आयोगाने जात, भाषा आणि इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवू नका, असे निर्बंध घातले तरी, स्वाभाविक सहकार्य आणि आपल्या माणसाला सत्ताधीश करण्याची माणसा-माणसामधील भूमिका शांत बसू देत नाही. शिवाय लोकशाहीनेच तसा अधिकारही दिलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत लोकसभा पोटनिवडणुकीत बेळगावची लढाई अशीच सुरू आहे. ही लढाई राष्ट्रीय पक्षांना अवघड जात असून एकगठ्ठा मराठी मते जर समिती उमेदवाराला पडली, तर मराठा समाज आणि मराठी भाषिक या निवडणुकीत विजयी होऊ शकतो.

बेळगाव लोकसभा मतदारसंघ बहुभाषिक आहे. १८.२७ लाख एकूण मतदार आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक संख्या आहे लिंगायत मतदारांची. लिंगायत मतदार ६.२५ लाख आहेत. यापाठोपाठ ३.२५ लाख मराठा मतदारांचा क्रमांक लागतो. १.८० लाख कुरबर, ६५ हजार विणकर, ४० हजार जैन, ४० हजार ब्राम्हण, तसेच २ लाख मुस्लिम आणि २ लाख मागासवर्गीय मतदारांचा समावेश आहे.

मतदारसंघात सध्या एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये खरी रस्सीखेच सुरू असून त्यांना समितीच्या शुभम शेळके यांचे आव्हान आहे. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण या तीन विभागातील एकगठ्ठा मराठी मते, काँग्रेस आणि भाजपमधील नाराज वर्गाची मते, तसेच मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाची २० टक्के मते जरी शुभम शेळके यांना पडली, तर विजय निश्चित असल्याचे राजकीय अभ्यासक सध्या बोलत आहेत.

सुरेश अंगडी लिंगायत आणि मराठा मतांवर निवडून येत होते. याच मतांवर भाजपची अर्थात मंगला अंगडी यांची भिस्त आहे. मात्र महागाई व इतर अनेक कारणांमुळे जनतेत भाजपबद्दल नाराजी असून, याचा फटका बसेल, की लोक सहानुभूतीने त्यांना मतदान करतील, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. घराणेशाही नाही असे म्हणणाऱ्या भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेला भाजपमधील अंतर्गत गट सावरला गेला नाही, तर भाजपला ही निवडणूक अवघड ठरणार आहे.

काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी हे वाल्मिकी नायक समाजातील असून, आपण जातीय समीकरणांवर विश्वास ठेवत नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यामुळे सर्व समाजातील लोकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. दिग्गज नेत्यांना आमंत्रित करून सर्व समाजाच्या गाठीभेटी घेण्यावर काँग्रेसचा भर आहे. १५ वर्षांपासून भाजपने काँग्रेसला या मतदारसंघात डोके वर काढू दिलेले नाही, यामुळे काँग्रेसची परिस्थिती अवघडच आहे.