Greetings to Pandit Deendayal Upadhyay | कोल्हापुरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

कोल्हापुरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

ठळक मुद्देपंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन तटाकडील तालीम येथे प्रतिमा पूजन

कोल्हापूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने छत्रपती ताराराणी सभागृहात पंडित त्यांच्या प्रतिमेस महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, गटनेता अजित ठाणेकर व कर्मचारी उपस्थित होते.

भाजपतर्फे २४० बुथवर उपाध्याय यांना अभिवादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक तथा भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या १०४ व्या जयंती निमित्त शुक्रवारी भाजपच्या २४० बुथवर प्रतिमा पुजन करण्यात आले. यानिमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर भाजपाचे ध्वज उभारण्यात आले. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या तपोवन वॉर्ड  मधील बूथ क्रमांक ६१ वर उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे याच भूमिकेतून उपाध्याय यांनी संपूर्ण आयुष्य व्यतित केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी जरगनगर येथील तर देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी तटाकडील तालीम वॉर्ड मधील बुथवर प्रतिमा पूजन केले. जिल्हा उपाध्यक्ष संजय सावंत व विजय आगरवाल यांनी बूथ अध्यक्षांपर्यंत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. 

या कार्यक्रमांना संघटन मंत्री अशोक देसाई, गटनेते अजित ठाणेकर, मनपा विरोधीपक्ष नेते विजय सुर्यवंशी, हेमंत अराध्ये, राजू मोरे, संजय सावंत, अशोक लोहार, अमोल पालोजी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Greetings to Pandit Deendayal Upadhyay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.