शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर १५ कोटींतून रस्ता दर्जेदार होण्याची गरज

By admin | Updated: December 5, 2014 23:30 IST

कोल्हापूर-गगनबावडा रस्ता : जानेवारी महिन्यापासून कामाला येणार वेग

प्रकाश पाटील - कोपार्डे कोल्हापूर-गगनबावडा रस्ता हा कोकणाला जोडणारा सर्वांत सुरक्षित मार्ग आहे. येथूनच तळकोकणातील अनेक तीर्थस्थळे व गोवा, सिंधुदुर्ग, विजयदुर्गला जाता येत असल्याने या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर या रस्त्याचा विकास झाला, तर या मार्गावरील सर्वच गावांचा निश्चितच विकास होऊ शकतो. त्यामुळे या रस्त्यासाठी मंजूर १५ कोटींचा निधी योग्यप्रकारे मार्गी लागण्याची आवश्यकता आहे. शासनाचे दुर्लक्ष व योग्यवेळी व मुबलक निधी उपलब्ध होत नसल्याने या रस्त्याची निगा व डागडुजी राखता येत नाही. पावसाळ्यात या मार्गावर प्रचंड पाऊस असतो. परिणामी रस्ता लवकर खराब होतो, असे सांगण्यात आले. या रस्त्यावर बहुतांश ठिकाणी जमिनीचा भाग हा काळवट मातीचा असल्याने रस्ता खचण्याचे व त्याची पातळी बिघडण्याचे प्रकार घडतात.सध्या या रस्त्यावर ८० टक्के खड्डे पडल्याने लेव्हलिंग कोर्सचे काम चालू आहे. पॅचवर्कचे काम त्यानंतर व नंतर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाला सुरुवात होणार आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये या रस्त्यावर ७५ लाख रुपये खर्च झाले आहेत. वर्ष २०१४-१५ साठी १५ कोटी मंजूर असून, शिंगणापूर फाटा ते भामटे (ता. करवीर) येथेपर्यंत रस्त्यासाठी दहा कोटी, तर साळवण ते गगनबावडा या रस्त्यासाठी पाच कोटी मिळणार आहेत. लोकसभेपूर्वीच या मार्गावरील शिंगणापूर फाटा ते भामटे अशा १२ कि.मी.च्या रस्त्यासाठी ‘सीआरएफ’मधून दहा कोटी मंजूर झाले आहेत. विशेष दुरुस्तीमध्ये ६६ लाख आणि ३० लाख असे दोन निधी मंजूर आहेत. १३व्या वित्त आयोगामधून सांगशी ते सैतवडे फाट्यासाठी दोन कोटी २४ लाख निधी मंजूर झाला. पूरहमीतून आणखी सात कोटी मिळणार आहेत. स्टेट बजेटमधूनही आपण या मार्गासाठी स्वतंत्र निधी द्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. - चंद्रदीप नरके, आमदारसध्या २०१४-१५ मध्ये कोल्हापूर-गगनबावडा मार्गासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला. लवकरच ही कामे सुरू होतील. सध्या या मार्गावर लेव्हिंग कोर्स सुरू असून, शिंगणापूर ते भामटेसाठी रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम चालू करणार आहे. योग्य प्रमाणात निधी मिळाल्यास रस्त्याचे काम चांगले करता येईल. - एस. व्ही. सांगावकर, उपअभियंता, विशेष प्रकल्प