शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांच्या खात्यावर १५०० रुपयांचे अनुदान जमा : दिलेला शब्द सरकारने पाळल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांच्या लॉकडाऊन काळात उपजीविकेकरिता जाहीर झालेले दीड हजार रुपयांचे अनुदान शुक्रवारी शहरातील ७६०० फेरीवाल्यांच्या बँक ...

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांच्या लॉकडाऊन काळात उपजीविकेकरिता जाहीर झालेले दीड हजार रुपयांचे अनुदान शुक्रवारी शहरातील ७६०० फेरीवाल्यांच्या बँक खात्यात जमा झाले. सुमारे एक कोटी १४ लाखांचे अनुदान संबंधित फेरीवाल्यांच्या खात्यावर परस्पर जमा केल्याची माहिती नगरविकास विभागाच्या नगरपालिका संचालनालयामार्फत कोल्हापूर महापालिका प्रशासनास कळविली आहे.

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तळागाळातील लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून रस्त्यावरील फेरीवाल्यांना पंधरा दिवसांसाठी १५०० रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. सध्याच्या महागाईच्या काळात १५०० रुपयांचे अनुदान अतिशय कमी असून, किमान पाच हजार रुपये तरी दिले पाहिजेत, अशी मागणी होती. मात्र, ठाकरे सरकारने दिलेला शब्द पाळला आणि शुक्रवारी फेरीवाल्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा केले.

नागरी उपजीविका अभियान या पीएम स्वनिधीअंतर्गत पथविक्रेत्यांना बँकांमार्फत गेल्या वर्षी कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने आणली होती. त्यासाठी कोल्हापूर शहरातून ७६०० पदपथ विक्रेत्यांनी मागणी केली होती. त्यातील ४४७८ लोकांना कर्ज मिळाले; परंतु राज्य सरकारने कर्ज घेतलेल्यांसह ज्यांनी ज्यांनी मागणी केली होती, त्यांनाही अनुदानाची रक्कम दिली आहे.

- पॉइंटर -

- शहरातील फेरीवाल्यांची संख्या - अंदाजे ११ हजार

- नोंदणी झालेल्या फेरीवाल्यांची संख्या - ५६०७

- गतवर्षी लॉकडाऊनमध्ये कर्ज घेतलेले फेरीवाले - ४४७८

- १५०० रुपये अनुदान जमा झालेले फेरीवाले - ७६००

- कर्जाची मागणी केली, पण मिळाले नाही असे फेरीवालेही अनुदानास पात्र

- प्रतिक्रिया - १

राज्य सरकारने शहरातील फेरीवाल्यांच्या खात्यावर १५०० रुपयांचे अनुदान जमा केले. काही फेरीवाल्यांचे आयएफसी कोड चुकले असल्याने त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. सोमवारी दुरुस्ती करून तेही जमा केले जाईल.

शिल्पा दरेकर, उपायुक्त

कोल्हापूर महानगरपालिका

प्रतिक्रिया - २

पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनकरिता फेरीवाल्यांना १५०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. मदत थोडी असली तरी खात्यावर जमा झाली, हे महत्त्वाचे आहे.

मोहन क्षत्रिय, फेरीवाला

-चौकट -

बँकांचा असाही आगाऊपणा-

सरकारकडून जमा झालेले १५०० रुपयांचे अनुदान काही बँकांनी कोरोनाकाळात दिलेल्या कर्ज खात्यात वळते केले आहेत. वास्तविक उपजीविकेसाठी हे अनुदान दिलेले असताना ते कर्जाला वळविणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया काही फेरीवाल्यांनी दिली.

-