Kolhapur: रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे बेपत्ता, घातपाताचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:47 IST2025-07-18T17:47:04+5:302025-07-18T17:47:59+5:30

कर्नाटकमध्ये मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चा

Gram Panchayat member Lakhan Benade from Rangoli missing in Kolhapur | Kolhapur: रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे बेपत्ता, घातपाताचा संशय

Kolhapur: रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे बेपत्ता, घातपाताचा संशय

हुपरी : रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन आण्णासो बेनाडे बेपत्ता असल्यामुळे खळबळ उडाली आहे. इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद आहे. बहीण नीता उमाजी तडाखे (वय ३५, रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

१० जुलैला लखन बेनाडे सकाळी दहा वाजता कोल्हापूर येथे जात असल्याचे सांगून निघून गेले हाेते. कर्नाटकमध्ये एक मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत निपाणी संकेश्वर पोलिसांकडे माहिती घेतली असता कुठल्याही प्रकारची कायदेशीर नोंद आढळून आली नाही.

Web Title: Gram Panchayat member Lakhan Benade from Rangoli missing in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.