शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचारी होणार पोलिसांचे पंच

By admin | Updated: July 28, 2015 22:03 IST

फितुरी टाळण्यासाठी गृहविभागाचा उपाय

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -गुन्ह्यांमध्ये घटनास्थळांचा पंचनामा करणारे न्यायालयात सुनावणीवेळी फितूर होतात. त्यामुळे राज्याच्या गृहविभागाने पंचनाम्याच्या कामी सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मन:स्तापात मात्र भर पडणार आहे. खून, बलात्कार, दरोडे यासारख्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये पंच म्हणून सरकारी कर्मचारी राहणार असल्याने न्यायालयाच्या खेटा घालाव्या लागणार आहेत.गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा तपासी अधिकारी करतात. पंचनाम्यावेळी उपस्थित पंचाची साक्ष खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वाची ठरते. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीसाठी घेण्याकरिता काही प्रकरणामध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो. तपासी अधिकाऱ्याने तत्कालीन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावणीदरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते. ऐनवेळी पंच फितूर होत असल्यामुळे बऱ्याचशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषारोप सिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणी दरम्यान पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहणार असल्याचे गृह विभागाचे म्हणणे आहे. परिसरातील सरकारी कर्मचारीखटल्याची सुनावणी होणाऱ्या परिसरात वास्तव्य असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यास पंच म्हणून घेता येणार आहे. जेणेकरून खटल्याच्या सुनावणीदरम्यान संबंधित पंचास उपस्थित राहणे सुलभ होणार आहे. शिक्षकांनाही घेणारइतर शासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षकही पंच म्हणून ठेवण्यात येणार आहेत. अशैक्षणिक कामांचा बोजा वाहणाऱ्या शिक्षकांच्या कामात भरच पडणार असल्याने या आदेशामुळे शिक्षकवर्गासह इतरही सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.