शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

शासकीय कर्मचाऱ्यांची 'दिवाळी'च; कोल्हापुरात सलग सहा दिवस कार्यालये राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:59 IST

२७ पासून नियमित कामकाज

कोल्हापूर : शनिवार-रविवार.. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली स्थानिक सुटी, दिवाळीचे तीन दिवस असे मिळून सलग सहा दिवस सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. पुढच्या शुक्रवारी (दि. २४) एक दिवस कार्यालय सुरू राहणार आहे, त्यातही कुणी रजा टाकलीच तर सलग दहा दिवसांनंतरच त्यांचे कार्यालयात आगमन होणार आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम असणाऱ्यांनी पुढील आठवडाभर तिथे न फिरलेलेच बरे..दिवाळी या वर्षातील सर्वात मोठ्या सणाला सगळ्यांनाच सुटी हवी असते. सणातील धार्मिक विधी, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, गावी जाणे-येणे असा सगळीकडे आनंदी आनंद असतो. शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा आनंद यंदा द्विगुणित करणारा आहे. शुक्रवारचा एक दिवस कार्यालय सुरू आहे. शनिवार व रविवारी नियमित सुटी आहे.सोमवारी दिवाळीचा पहिला दिवस असून, त्यादिवशी नरकचतुर्दशी आहे. या दिवशी शासकीय सुटी नसते; पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुटी जाहीर केली आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, असे तीन दिवस शासनाने दिवाळीची सुटी जाहीर केली आहे. त्यानंतर फक्त शुक्रवारचा एक दिवस मध्ये येतो. त्यानंतर पुन्हा शनिवार-रविवारी सुटी आहे. शुक्रवारी एक दिवस कुणी रजा टाकली तर तब्बल दहा दिवसांनीच ते कामावर रुजू होणार आहेत.एवढ्या सुट्या बघता नागरिकांनी हे वेळापत्रक बघूनच शासकीय कार्यालयाची पायरी चढणे गरजेचे आहे. अन्यथा विनाकारण हेलपाटा होण्याचीच शक्यता जास्त आहे. सोमवार (दि. २७) पासूनच शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू होतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Government Employees' Diwali: Offices Closed for Six Consecutive Days

Web Summary : Kolhapur government offices will be closed for six days due to Diwali holidays and local holidays. Employees may extend the break to ten days by taking leave on Friday. Offices will reopen regularly on Monday, October 27th.