चंद्रकांत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:33 IST2021-06-11T20:25:51+5:302021-06-11T20:33:40+5:30
chandrakant patil Bjp Kolhapur : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दोन दिवस त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. गुरूवारी त्यांच्या वाढदिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे फोनव्दारे अभीष्टचिंतन केले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दोन दिवस त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. गुरूवारी त्यांच्या वाढदिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे फोनव्दारे अभीष्टचिंतन केले.
पाटील हे वाढदिनी गुरूवारी पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. रात्री ते कोल्हापुरात आले. शुक्रवारी सकाळीच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उद्योजक शंकर पाटील यांच्यासह पाटील यांची निवासस्थानी भेट देवून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पाटील यांच्या संभाजीनगरमधील निवासस्थानी दुपारनंतर शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली. आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वत फेटा बांधून पाटील यांचा शाल घालून सत्कार केला. आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक,भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, संचालिका शौमिका महाडिक, स्वरूप महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि. प. सदस्य राहूल आवाडे, राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, निवास साळोखे, उत्तम कांबळे, भारत खराटे, आण्णासाहेब चकोते, भरत ओसवाल, सुरेंद्र जैन, जयेश कदम, भाजपचे बाराही तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भूपेंद्र यादव, सुरेश प्रभू, सतीश पुनिया, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, गिरीष महाजन, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, प्रविण दरेकर, विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, गिरीश बापट यांनीही त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने गेले दोन दिवस अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी कणेरी मठावर उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पालाही मदत केली.