शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजगोळीच्या मातीला सोन्याचा भाव!

By admin | Updated: September 6, 2016 01:15 IST

प्रशासनाचा कानाडोळा : दररोज रात्री ५० ट्रक मातीची उचल; पाटणे फाटा येथे वाळूचा बाजार, रस्त्यांची दुर्दशा

नंदकुमार ढेरे -- चंदगड --तालुक्याच्या पूर्वेकडे असलेल्या राजगोळी खुर्द, चन्नेहट्टी, तिरमाळ, यर्तेनहट्टी, कामेवाडी येथील मातीची वाळू म्हणून विक्री करण्याचा धंदा सध्या या भागात जोरात सुरू असून, रोज रात्री ५० ट्रक मातीचे बेकायदेशीर उत्खनन केले जात आहे. एका रात्रीत जवळपास दहा लाख रुपयांची उलाढाल सुरू असून, शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी चुकवून हे वाळूमाफिया गब्बर होत आहेत. प्रशासनाची यंत्रणा असूनही कारवाई मात्र का होत नाही? याचे नवल जनतेला वाटत आहे.घर बांधकाम, रस्ते काँक्रिटीकरण, साकव बांधणे, आदी कामांसाठी कर्नाटकातील रामनगर, खानापूर, गोकाक या ठिकाणाहून चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू येत होती; पण कर्नाटक सरकारने वाळू उपशावर रॉयल्टी बसविल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळूटंचाई निर्माण झाली. याला पर्याय म्हणून राजगोळी परिसरातील काही लोकांनी नदीकाठची माती काढून त्यावर पाणी मारून ही वाळू रामनगरची आहे, असे सांगून लोकांच्या गळ्यात मारत आहेत. सुरुवातीच्या काळात लोकांना माहीत नसल्याने त्यांनी वाळू खरेदी करण्यास नकार दिला. त्यावेळी या वाळूमाफियांनी दर कमी करून विक्री करण्यास सुरुवात केली. वाळूचा तुटवडा सगळीकडेच पडत असल्याने नाईलाजास्तव लोकांनी ही वाळू खरेदी करण्यात सुरुवात केली. त्यामुळे या माफियांनी वाळूचे दर १२ हजारांवरून ३० हजारांपर्यंत वाढविले आहेत.कशी तयार होते वाळूराजगोळी परिसरातील माती ही पाढऱ्या वाळूकाश्म पद्धतीची आहे. या मातीमध्ये बारीक खड्यांचे प्रमाण आहे. त्यामुळे जेसीबीद्वारे सपाट अथवा टेकडीजवळील माती काढून त्याचा एकत्र मोठा ढीग रचला जातो. या मातीवर मोटारीच्या प्रेशरने पाणी मारून धुतली जाते. दिवसभर काढलेली माती धुतल्यानंतर तिची वाळू बनते. त्यानंतर रात्री चंदगड, पाटणे फाटा, कोवाड, माणगाव बरोबरच बेळगाव परिसरातील जवळपास ५० ट्रकद्वारे ही वाळू सावधगिरीने पाठविली जाते. दड्डी, हेमरसमार्गे २० ते २५ ट्रक कर्नाटकात जातात, तर २० ते २३ ट्रक दुंडगे, कुदनूर मार्गे चंदगड तालुक्यात येतात. पाटणे फाटा येथे दररोज पहाटे चार वाजल्यापासून वाळूचा बाजार भरतो. वाळूने भरलेले ट्रक रस्त्याच्याकडेला उभे राहतात. आॅर्डरीप्रमाणे या वाळूची विक्री केली जाते. राजगोळी येथे जाग्यावर दहा हजारांपर्यंत एक ट्रक भरून मिळतो. पुढे हेच ट्रकमालक २५ हजारांपेक्षा पुढे ही वाळू विकतात. एका रात्रीत राजगोळी, तिरमाळ, यर्तेनहट्टी, कामेवाडी येथे दहा लाखांची उलाढाल होते. शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी हे वाळूमाफिया बुडवित आहेत. दररोज रात्री होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे ट्रकमधील पाणी व वाळू पडून रस्त्यावर निसरट होण्याबरोबरच मोठ-मोठे खड्डे पडून रस्ता वाहतुकीस अयोग्य बनत आहे.तहसील कार्यालय : ठोस कारवाईची गरजराजगोळी परिसरात अवैध माती वाळू उत्खनन होत आहे. याबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठविल्यानंतर चंदगड तहसील कार्यालयातर्फे काही वाळूमाफियांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर काही दिवस वाळू उपसा बंद होता; पण गेल्या १५ दिवसांत हे वाळूमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून, पुन्हा राजरोस वाळूची तस्करी होत आहे. चंदगड तहसील कार्यालयातर्फे वरवरची कारवाई न करता ठोस कारवाई केली, तरच बेकायदेशीर उत्खनन थांबणार आहे. अन्यथा ‘चिरिमिरी’च्या आशेने केवळ कारवाईचा दिखाऊपणा केल्यास हे वाळूमाफिया शिरजोर झाल्याशिवाय राहणार नाहीत.