शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’चे मतदान २० एप्रिलला

By admin | Updated: March 12, 2015 00:59 IST

मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)साठी २० एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी (दि. १७) जाहीर होऊन त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. माघारीची मुदत ४ एप्रिलपर्यंत आहे. ‘गोकुळ’ दूध संघाची अंतिम मतदार यादी ७ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर दहा दिवसांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी मतदान, मतमोजणी या सर्व यंत्रणेचे नियोजन करावे लागते. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन-तीन अधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. १७ ते २३ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत आहे. त्यातील एक रविवार, २० मार्चला अमावास्या व २१ रोजी गुढीपाडवा हे तीन दिवस आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवसच मिळणार आहेत. २४ मार्चला छाननी, तर २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे. २० एप्रिलला तालुक्याच्या ठिकाणी मतदान होणार असून, २१ एप्रिलला मतमोजणी होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सत्तारूढसह विरोधकांनी निवडणुकीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. सत्तारूढ गटाचा ठरावधारकांशी संपर्क आहेच; पण विरोधकांनीही जोरदार तयारी केली आहे. ठरावधारकांच्या भेटीगाठींबरोबर इच्छुकांचीही त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. सत्तारूढ गटाचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. या गटाच्या पॅनेलवर विरोधी पॅनेलची रचना राहणार आहे. सत्तारूढ गटातील एखादा ‘नाराज’ हाताला लागतो काय, यावर विरोधकांची नजर आहे. सध्या ठरावांच्या संख्येवरून निवडणूक एकतर्फी वाटत असली तरी सत्तारूढ गटाला ती तितकीशी सोपी नाही. सत्तारूढ गटांतर्गत असलेल्या कुरबुरी, विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणाचे थेट परिणाम या निवडणुकीत दिसणार आहेत. गेल्या निवडणुकीत २७०० पैकी २२०० ठराव सत्तारूढ गटाकडे असतानाही त्यांच्या काही उमेदवारांची दमछाक उडाली होती.(प्रतिनिधी) निवडणूक कार्यक्रम असा :१७ ते २३ मार्च - उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ४२४ मार्च - छाननी२५ मार्च ते ४ एप्रिल - माघार२० एप्रिल - मतदान २१ एप्रिल - मतमोजणी