‘गोकुळ’च्या सभेला सभासदांनी मोठ्या संख्येने हजर राहावे - मुश्रीफ, सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:34+5:302021-02-05T06:57:34+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या बुधवारी (दि. ३) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी दूध संस्था प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व संघाच्या ...

Gokul meeting should be attended by a large number of members - Mushrif, Satej Patil | ‘गोकुळ’च्या सभेला सभासदांनी मोठ्या संख्येने हजर राहावे - मुश्रीफ, सतेज पाटील

‘गोकुळ’च्या सभेला सभासदांनी मोठ्या संख्येने हजर राहावे - मुश्रीफ, सतेज पाटील

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या बुधवारी (दि. ३) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी दूध संस्था प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व संघाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून ‘गोकुळ’च्या भ्रष्ट कारभाराबद्दल सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. गोकुळ दूध संघ हा सभासदांच्या मालकीचा राहावा आणि दूध उत्पादकांना जास्तीतजास्त दर मिळावा यासाठी हा लढा सुरू आहे. या लढ्याला दूध उत्पादक सभासदांचे आजपर्यंत मोठे पाठबळ मिळाले आहे. सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सत्तारूढ गटाच्या कारभारासंदर्भात जाब विचारण्याची संधी दूध उत्पादक सभासदांना मिळणार आहे. गोकुळचा लेखापरीक्षण अहवाल पाहता अनेक आक्षेपार्ह बाबी यामध्ये निदर्शनास आल्या आहेत. याबाबत सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून सत्तारूढ गटाला जाब विचारावा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Web Title: Gokul meeting should be attended by a large number of members - Mushrif, Satej Patil