शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’ निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार, 'मुश्रीफ यांना वगळून पॅनेल करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:15 IST

खासदार धनंजय महाडिक यांची घोषणा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुती म्हणून एकत्र लढवली जाईल अशी घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली. भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव दूध संस्थांनी भाजपकडे जमा करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, समरजित घाटगे, अंबरीष घाटगे, दिलीप पाटील, स्वाती कोरी, संजय पाटील, उमेश आपटे, नाथाजी पाटील, रवीश पाटील-कौलवकर, आनंद गुरव, भिकाजी जाधव, प्रवीणसिंह पाटील, अशोक चराटी उपस्थित होते.महाडिक म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आव्हान अजिबात वाटत नाही. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळे, गोकुळच्या निवडणुकीतही महायुतीलाच कौल मिळेल. ‘गोकुळ’च्या निवडणुकीला जिल्ह्यातील किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वांनी तयारी करावी.शौमिका महाडिक म्हणाल्या, गेल्या निवडणुकीत गोकुळमधील सत्तेची संधी थोडक्यात हुकली. त्यावेळी झालेल्या चुका सुधारून आता या निवडणुकीला सामोरे जाऊया. गेल्या पाच वर्षांत दूध संस्थांसाठी, दूध उत्पादकांसाठी अनेकवेळा संघर्षाची भूमिका घ्यावी लागली. त्याचा त्रास आमच्या संस्थांनाही झाला. परंतु, आता महायुतीचे अध्यक्ष असल्याने आम्ही सहकार्याची भूमिका घेतली आहे. आता महायुतीची सत्ता गोकुळमध्ये येईल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्वच बाबतीत अच्छे दिन येतील.

मुश्रीफ यांना वगळून पॅनेल कराकिती दिवस हसन मुश्रीफ यांचे ओझे आपल्यावर घेणार असा प्रश्न उपस्थित करत भाजपने स्वतंत्र पॅनेल करावे अशी मागणी जयवंत सुतार, आजरा आणि मार्तंड जरळी गडहिंग्लज यांनी यावेळी केली. परंतु, त्यानंतरही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.जिल्हा परिषदेबाबत फडणवीस करणार घोषणाजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांबाबत येत्या चार दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतील अशी माहितीही खासदार महाडिक यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahayuti to contest Gokul election under BJP, exclude Mushrif.

Web Summary : Mahayuti will contest the Gokul milk union election under BJP leadership. Calls to exclude Hasan Mushrif from the panel were made. Devendra Fadnavis will announce Zilla Parishad decisions soon.