शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक स्थगितीसाठी ‘गोकुळ’ पुन्हा उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात शुक्रवारी पुन्हा याचिका दाखल केली आहे. शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या निवडणूक स्थगितीच्या आदेशालाच त्यांनी आव्हान दिले असून यावर सोमवारी (दि. ८) सुनावणी होणार आहे.

राज्य शासनाने कोविडच्या रुग्णात वाढ होत असल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना २४ फेब्रुवारी रोजी स्थगिती दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहिली. आदेशाबाबत स्पष्टीकरण मिळावे, यासाठी ‘गोकुळ’ने याचिका दाखल केली होती. मात्र, सुनावणीनंतर ती मागे घेतली. तोपर्यंत प्रारूप यादीवरील हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली. शुक्रवारी पुन्हा ‘गोकुळ’ने उच्च न्यायालयाच याचिका दाखल करत निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी केली. शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या आदेशाला आव्हान दिले असून, या स्थगितीमधून ‘गोकुळ’ला वगळू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. शासनाच्या वतीने विभागीय सहनिबंधक मुंबई बाजीराव शिंदे, तर प्राधिकरणाच्या वतीने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांना प्राधिकृत केले आहे.

शासनाच्या भूमिकेवरच निवडणुकीचे भवितव्य

राज्य शासनाच्या आदेशाला आव्हान दिल्याने आता त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शासन नेमके म्हणणे काय मांडणार, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

इतर संस्थांवर परिणाम नाही

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यापैकी २१ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. वीस संस्थांमध्ये ‘गोकुळ’चा समावेश आहे. निवडणूक नको म्हणून ‘गोकुळ’ जरी न्यायालयात गेले असले तरी त्या निकालाचा परिणाम उर्वरित संस्थांवर होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘गोकुळ’ने यांना प्रतिवादी....

राज्य शासन

सहकार आयुक्त

विभागीय उपनिबंधक (दुग्ध)

सहायक निबंधक (दुग्ध)