गोवा बनावटीचा मद्यसाठा अवैधरीत्या वाहतूक करताना जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:14+5:302021-02-05T06:57:14+5:30

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील पारगड-सिंधुदुर्ग मार्गावर वाघोत्रे येथे चोरट्या मार्गाने वाहतूक होणारा ...

Goa-made liquor stocks seized while being transported illegally | गोवा बनावटीचा मद्यसाठा अवैधरीत्या वाहतूक करताना जप्त

गोवा बनावटीचा मद्यसाठा अवैधरीत्या वाहतूक करताना जप्त

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील पारगड-सिंधुदुर्ग मार्गावर वाघोत्रे येथे चोरट्या मार्गाने वाहतूक होणारा १ लाख ७५ हजार किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा सोमवारी पहाटे जप्त केला.

उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास या मार्गावर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चंदगड तालुक्यातील वाघोत्रे येथे पारगडमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडलेल्या चोरट्या मार्गावर सापळा रचण्यात आला. त्यात पहाटे चारचाकी थांबवून तपासणी केली. त्यात विविध ब्रँडचे ३३ बाॅक्स आढळून आले. त्याची १ लाख ७५ हजार २०० रुपये अशी किंमत होती. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, एकूण ३ लाख ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत निरीक्षक संभाजी बर्गे, जगन्नाथ पाटील, किशोर नडे, मारुती पवार, सचिन काळेल, संदीप जानकर, जय शिणगारे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Goa-made liquor stocks seized while being transported illegally