Kolhapur: पोलिस दिसताच कारने सुसाट सुटले, कंपाउंडमुळे अडकले; गोवा बनावटीच्या दारूसह दोघे जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:58 IST2025-05-09T17:57:11+5:302025-05-09T17:58:24+5:30

गगनबावडा : येथे कोल्हापूर - गगनबावडा महामार्गावर गोवा बनावटीची विनापरवाना दारू पोलिसांनी कारचा थरारक पाठलाग करून पकडली. यामध्ये विजय ...

Goa made liquor seized in Gaganbawada kolhapur Two arrested | Kolhapur: पोलिस दिसताच कारने सुसाट सुटले, कंपाउंडमुळे अडकले; गोवा बनावटीच्या दारूसह दोघे जण ताब्यात

Kolhapur: पोलिस दिसताच कारने सुसाट सुटले, कंपाउंडमुळे अडकले; गोवा बनावटीच्या दारूसह दोघे जण ताब्यात

गगनबावडा : येथे कोल्हापूर - गगनबावडा महामार्गावर गोवा बनावटीची विनापरवाना दारू पोलिसांनी कारचा थरारक पाठलाग करून पकडली. यामध्ये विजय उर्फ दिग्विजय दिलीप पांढरपट्टे (वय ३१, रा. गणेशनगर, इचलकरंजी) व अजित विश्वनाथ भंडारे (३७, रा. जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले) यांना चार लाख १८ हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी कारही (एमएच १२, एमबी ९७८६) जप्त केली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विजय व अजित हे करूळ घाटमार्गे कारने गगनबावडा चौकात आले असता पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. यावेळी कार कोल्हापूरकडे सुसाट गेल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी कार वसतिगृहाच्या पाठीमागे नेली. मागे कंपाउंड असल्याने कार तिथेच सोडून संशयितांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. परंतु पोलिसांनी पाठलाग करत त्यांना गगनबावडा विश्रामगृहाजवळ पकडून ताब्यात घेतले.

या कारवाईमध्ये सहायक फौजदार रंगराव सौंदडे, पोलिस कॉन्स्टेबल सुरेश कांबळे, सूरज देसाई, शरद इंजुळकर, विक्रम परीट, हवालदार सतीश पाटील, विनोद ढवळे, शशिकांत कोळेकर यांनी सहभाग घेतला. सहायक पोलिस निरीक्षक डी. बी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Goa made liquor seized in Gaganbawada kolhapur Two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.