शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळास राजाराम महाराजांचे नाव द्या

By admin | Updated: August 1, 2015 00:10 IST

समर्थकांचे धरणे : आश्वासनानंतर आंदोलन मागे

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी राजाराम महाराजांच्या जयंतीदिनी व्हीनस कॉर्नर चौकातील छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्यासमोर राजाराम महाराज प्रेमींतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.कोल्हापूर विमानतळाचा इतिहास पाहता, छत्रपती राजाराम महाराजांनी प्रथमत: कोल्हापूर संस्थानामध्ये वाहतुकीच्या दृष्टीने, व्यापारवाढीसाठी व प्रजेच्या दृष्टीने विमानतळ असावा, या हेतूने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. आजच्या उजळाईवाडी विमानतळाच्या परिसरास पूर्वी ‘उदासीबुवाचा माळ’ असे संबोधले जात होते. या माळावर राजाराम महाराजांनी १९३०-३५ या कालावधीत विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी १७० एकर जमिनीचा परिसर हस्तगत केला होता. सिंगल इंजिन व्हिजन टाईप एअरक्राफ्ट अशा प्रकारची छोटी विमाने की जी एका पंख्यावर दुसरा लहान पंखा अशी चार पंख्यांनिशी होती, अशी विमाने कार्यरत होती. विमानतळाचे उद्घाटन ४ मे १९४० रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले. सन १९७८-७९ मध्ये या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यांनी दूरदृष्टी ठेवून केलेल्या कार्याच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी या विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव द्यावे, ही राजाराम महाराजप्रेमींची मागणी आहे. यासाठी राज्य शासन, महापालिका व जिल्हा परिषद यांचे ठराव झाले आहेत. तरीही अजून नामकरण झालेले नाही. या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. भरपावसात हे आंदोलन सुरू होते. दुपारी एकच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, श्रीकांत घाटगे यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य ते करू, असे लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्याचबरोबर आंदोलकांची दूरध्वनीवरून खासदार शेट्टी यांच्याशी चर्चा करून दिली. यावेळी शेट्टी यांनी भारतीय विमान प्राधिकरणाचे अधिकारी व विमान वाहतूक मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात उदयसिंह राजेयादव, वसंत सिंघण, आदित्य मैंदर्गीकर, अ‍ॅड. प्रताप जाधव, विजय जाधव, बाळासाहेब निकम, इम्रान शरीफ, दिलीप टोणपे, अशोक सडोलीकर, अशोक मानकर, ज्ञानेश पोतदार, मनवीर केसरकर, पीयूष चव्हाण, सोमेश्वर सोलापुरे, इम्रान शेख, मनीषा शिंदे, रंजना कारंडे, आदींसह राजाराम महाराजप्रेमी सहभागी होते. (प्रतिनिधी)