शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पारगडवासीयांना तत्काळ जमिनी द्या

By admin | Updated: December 19, 2014 23:31 IST

शिवसेनेची मागणी : उपवनसंरक्षकांना निवेदन

चंदगड : ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) वरील रहिवाशांना त्यांच्या जमिनी तत्काळ परत कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी वनविभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकवडे यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, पारगडवर इ. स. १६७६ पासून येथील रहिवासी राहत आहेत. मात्र, या गडावरील जमिनीच्या ७/१२ वर वनविभागाची नोंद झाली आहे. या गडावर ३५० वर्षांपासून शेलार, मालुसरे, गडकरी, माळवे, आडाव, नांगरे, तांबे, डांगे, जांभळे, कुबल, शिंदे, झेंडे यांसह १२ बलुतेदारांची ५५ घरे आजही वास्तव्यास आहेत. या कुटुंबांच्या ७/१२ उताऱ्यावर वनविभागाची नोंद झाली आहे. त्यामुळे घरे असूनही पारगडवासीय बेघर झाले आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी पारगडचे संरक्षण केले त्यांची नावे सात-बारा उताऱ्यावर लावण्याचा प्रस्ताव वनविभागाने शासनाकडे पाठवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर, तालुकाप्रमुख संजय पाटील, महादेव गावडे, शरद पाटील, विजय चौगुले, नीलेश देवणे, प्रसाद पिलारे, गणेश जोग, सतीश कांबळे, परशराम डवरी, आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)