चित्रीकरण सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:10+5:302021-04-13T04:22:10+5:30

कोल्हापूर : राज्य शासनाच्या नियमानुसार कोल्हापूर चित्रनगरी येथे दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. या पुढील काळात लॉकडाऊन झाल्यास चित्रीकरण ...

Get permission to continue shooting | चित्रीकरण सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी

चित्रीकरण सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी

कोल्हापूर : राज्य शासनाच्या नियमानुसार कोल्हापूर चित्रनगरी येथे दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. या पुढील काळात लॉकडाऊन झाल्यास चित्रीकरण सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी चित्रपट व्यावसायिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

चित्रपट व्यावसायिक व अभिनेते आनंद काळे, मिलिंद अष्टेकर, बाळा जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर चित्रनगरी ही राज्य शासनाच्या अखत्यारित असून, सध्या येथे एक मराठी व एका हिंदी मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. सेटवर कोरोना विषयक सर्व नियमावलींचे पालन केले जाते. हा परिसर शहराबाहेर असल्याने कोरोना संसर्गाची शक्यता तुलनेने कमी आहे. आहे. तरी या पुढील काळात लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास येथील चित्रीकरण सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी.

--

Web Title: Get permission to continue shooting