Leopard in Kolhapur: बिबट्या आला, पोलिसांना फोन केले, पण हलक्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:18 IST2025-11-12T12:17:57+5:302025-11-12T12:18:11+5:30
अन्य शाळा न सोडण्याचा आदेश.. पालकांना मेसेज

Leopard in Kolhapur: बिबट्या आला, पोलिसांना फोन केले, पण हलक्यात घेतले
कोल्हापूर : सोमवारी रात्री साडेबारा वाजता मेरी वेदर मैदानात काही जणांना बिबट्या दिसला. मी आजोबाच्या काळजीपोटी तातडीने विवेकानंद कॉलेज परिसरात दाखल झालो. तेथून पहिल्यांदा नियंत्रण कक्ष (१०० नंबर), शाहुपुरी, जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क झाला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला. सकाळी साडेआठ वाजता पुन्हा विवेकानंद कॉलेज परिसरातच तो दिसला, अशी माहिती गौरव डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
ते म्हणाले, आमचे आजोबा प्राचार्य अभयकुमार साळुंखे विवेकानंद कॉलेज परिसरात राहतात. मी जवळच नागाळा पार्कात राहतो. मला साडेबारा वाजता मेरी वेदर मैदानात बिबट्याचे दर्शन झाल्याने कळताच, पोलिस प्रशासनास अलर्ट करण्याचा प्रयत्न केला. कॉलेजचे प्राचार्य, शिक्षकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला. सकाळी साडेअकरा वाजता कॉलेज परिसरातील एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण राहिले.
अन्य शाळा न सोडण्याचा आदेश.. पालकांना मेसेज
विवेकानंद महाविद्यालयासह परिसरात होली क्रॉस कान्व्हेंट स्कूल, सेंट झेव्हियर्स स्कूल या शाळा आहेत. या शाळांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने बिबट्या जेरबंद होईपर्यंत शाळा सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परिसरात बिबट्या आल्याचे समजताच काही शाळा घाईने विद्यार्थ्यांना घरी सोडतील, अशी शक्यता होती; मात्र विद्यार्थी बाहेर आले तर गर्दी होऊन अधिकच धोका निर्माण झाला असता त्यामुळे प्रशासनाने ही सूचना दक्षता घेतली. पालकांना भीती वाटू नये, यासाठी शाळांनी पालकांच्या व्हॉट्सॲपवर आपले पाल्य शाळेत सुरक्षित असून, शाळा नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेत सायंकाळी साडेपाच वाजता सुटतील, असा मेसेज पाठवला. त्यामुळे पालकांनी नि:श्वास सोडला