शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: माणसाळलेल्या ‘रंगा’वर गव्यांचा बहिष्कार, रानटी म्हशींसोबत जगण्याचा चमत्कार..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:52 IST

विहिरीत पडून मोडला होता पाय 

आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : भिन्न जातीच्या प्राण्याच्या पिलाला आपलेसे करून त्याला स्वीकारून त्याच्या सोबत जगण्याचा संदेश देणारी अनोखी घटना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्यात घडली आहे.दीड वर्षापूर्वी मलकापूर (ता. शाहुवाडी) येथे विहिरीत पडून गव्याच्या पिलाचा पाय मोडला होता. जखमी असलेल्या या पिलाला पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये स्थलांतरित केले. मोडलेल्या पायाचे ऑपरेशन करून हे पिलू नोहेंबर २०२५ मध्ये चालण्यायोग्य झाल्यावर चांदोली अभयारण्यात सोडण्यात आले. थोडे लंगडत चालणाऱ्या या गव्याच्या पिलाला वनकर्मचाऱ्यांनी प्रेमाने ‘रंगा’ हे नाव दिले.या दाट जंगल प्रदेशामध्ये खाण्यासाठी मुबलक अन्न गव्याच्या पिलाला असले तरी गवा प्रजात कशी जगते, काय खाते, कोणापासून धोका आहे, हे शिकवण्यासाठी गव्यांनी या ‘रंगा’ गव्याला स्वीकारले नाही. चांदोली धरणक्षेत्रातून स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील म्हशी ज्या जंगलात राहिल्या त्यांची संख्या वाढत गेली व त्या रानटी गुरांनी आता ‘रंगा’ला आपलेसे केले आहे. हा रंगा त्यांच्यासोबत एकत्र या दाट जंगलात फिरताना दिसतो.

ही रानटी गुरे जे खातात तेच हा गवा खातो. वाघासारख्या हिंस्त्र जनावराने जर हल्ला केला तर या म्हशी आक्रमक होऊन रंगाचे संरक्षणही करतात. उपचारामुळे माणसात राहिलेला गवा या रानटी गुरांसमवेत राहून तयार होत असून, निसर्ग अशा घटनांतून खूप काही शिकवतो. जगात युद्धाचे ढग दाटलेले असताना या म्हशींनी गव्याच्या पिलाला स्वीकारून प्रेमाची नवी परिभाषा घट्ट केली आहे.म्हशींची व ‘रंगा’ची पहारा देण्याची अनोखी पद्धतएका कळपात अंदाजे १० ते १५ म्हशी आहेत. रात्री सर्व जनावरे निवांत झोपावीत, याकरिता यातील दोन म्हशी बसलेल्या कळपाच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभे राहतात व कोणते जनावर हल्ला करणार नाही, याकडे लक्ष ठेवतात. रंगा ही पहारा देण्यासाठी उभे राहू लागला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rejected by gaur, orphaned gaur thrives with wild buffaloes in Chandoli.

Web Summary : Injured gaur 'Ranga' rescued, rejected by its kind, finds acceptance with wild buffaloes in Chandoli sanctuary. They protect him, showcasing nature's unique bonds.