Kolhapur Crime: विनयभंगाच्या गुन्ह्यात गुंड अमोल भास्कर अटकेत, न्यायालयीन कोठडीत रवानगी
By उद्धव गोडसे | Updated: March 15, 2023 12:55 IST2023-03-15T12:53:20+5:302023-03-15T12:55:43+5:30
भास्कर याच्यावर यापूर्वी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

Kolhapur Crime: विनयभंगाच्या गुन्ह्यात गुंड अमोल भास्कर अटकेत, न्यायालयीन कोठडीत रवानगी
कोल्हापूर : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड अमोल महादेव भास्कर (वय ३२, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात नुकतीच अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका सराफ व्यावसायिकाच्या पत्नीची छेड काढल्याबद्दल सराईत गुंड अमोल भास्कर याच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती.
पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी संशयित भास्कर याला अटक करून त्याची चौकशी केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. भास्कर याच्यावर यापूर्वी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.