शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव वर्गणीचे ‘नो टेन्शन’

By admin | Updated: August 2, 2015 23:51 IST

मनपा निवडणूक : इच्छुक आतापासूनच मंडळांच्या संपर्कात

गणेश शिंदे -कोल्हापूर -प्रभाग रचना व आरक्षणाच्या सोडतीतून महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पूर्वीच्या सर्वच प्रभागांमध्ये बदल झाल्याने आजी-माजी नगरसेवकांसह ‘भावी’ना ही नव्याने जिंकण्यासाठी जोडण्या कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचाच एक भाग म्हणून ‘गठ्ठा ’मतदानावर लक्ष ठेवून इच्छुक उमेदवारांनी सार्वजनिक तरुण मंडळांना ‘टार्गेट’ केले आहे. त्यामुळेच यंदा गणेशोत्सव मंडळांनाही वर्गणीचे फारसे ‘टेन्शन’ राहिलेले नाही. त्यामध्ये काही राजकीय पक्षांचे व आघाड्यांच्या कारभाऱ्यांनी जोडण्या सुरू केल्या आहेत.महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आॅक्टोबरमध्ये तर गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये आहे. निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी प्रभागातील छोटी-मोठी तरुण मंडळे पाठीशी असणे गरजेचे असल्याचे सर्वच इच्छुक नेते व राजकीय पक्षही जाणून आहेत. तरुण मंडळांना आपलेसे करण्यासाठी गणेशोत्सवासारखा दुसरा उत्सव असूच शकत नाही. त्यामुळेच गणेशोत्सव ‘इन कॅश’ करण्यासाठी इच्छुक यंत्रणा सक्रिय झाली आहे.प्रभाग रचनेत अनेक प्रभागांची अन्य प्रभागांत विभागणी झाली आहे. काही विद्यमान नगरसेवकांच्या मतदारसंघाची काही भाग इतर प्रभागात गेला आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांची नव्याने समाविष्ट झालेल्या परिसरातील मदत घेण्यासही प्रयत्न होणार आहे. ‘तू मला मदत कर, मी तुला मदत करतो’, असे ‘एकमेका साह्य करू...’चे चित्र जवळ-जवळ सर्वच प्रभागांत नव्या प्रभाग रचनेमुळे पाहायला मिळत आहे.राजकीय स्पॉन्सरशीपसाठी चढाओढ !गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत करून त्यांचे स्पॉन्सर घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यासाठी पाहिजे तेवढा जास्त हात सैल केला जाणार आहे. गतवर्षी शहरात सुमारे १२५० तालीम, तरुण मंडळांची नोंद पोलीस प्रशासनाकडे आहे. त्यापैकी प्रतिवर्षी गणेशोत्सव विसर्जन (अनंत चतुर्दशी) मिरवणुकीत पाचशेच्यावर गणेशोत्सव मंडळे सहभागी होतात. यावरून एकंदरीत, गणेशोत्सव मोठ्या झोकात होणार, अशी चिन्हे आहेत.मंडळा-मंडळातील पॅचअपवर भर...तरुण मंडळांमध्ये असणारे मतभेद मिटवून त्यांच्यात पॅचअप करण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला आहे. मंडळा-मंडळांत पॅचअप करून जास्तीत जास्त मते आपल्याकडे खेचण्यासाठी पहिल्या फळीतील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. जुने वाद, तक्रारी, हेवेदावे संपवून एकगठ्ठा मतदानासाठी ताकद लावली जात आहे.