शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून गणेशोत्सव..!

By admin | Updated: September 5, 2016 00:22 IST

थाटात होणार आगमन : पारंपरिक वाद्यांना पसंती

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे रविवारी मोठ्या दिमाखात आगमन झाले. तसेच पूलगल्ली तालीम, दिलबहार, संभाजी तरुण मंडळासह अनेक मंडळांनी गणेशमूर्तीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीसह प्रतिष्ठापना केली. दरम्यान आज, सोमवारी घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होणार असून, सजावटीबरोबरच नैवेद्यासाठी लागणारा सुका मेवा, प्रसादाचे मोदक, उदबत्ती, धूप, नारळ, कापूर या वस्तूंच्या खरेदीसाठी पापाची तिकटी, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, आदी ठिकाणी पूर्वसंध्येला भक्तांसह बच्चेकंपनीची मोठी गर्दी झाली होती. बाप्पाचा नैवैद्य ,आरास आदी वस्तूंच्या खरेदीकरिता पापाची तिकटी, महाद्वार रोड, गंगावेस येथील विविध अगरबत्ती, अत्तर विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये दिवाळीसारखी गर्दी झाली होती. गणेशापुढे ठेवण्यासाठी पाच फळे लागतात. त्यांचा भावही अन्य दिवसांच्या मानाने रविवारी चढाच होता. सायंकाळी पाचनंतर तर पापाची तिकटी, महाद्वार रोड, कुंभार गल्ली, शाहूपुरी कुंभार गल्ली, आदी परिसरात पाय ठेवायला जागा नव्हती. विशेष म्हणजे दीड दिवसाच्या गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. या उत्सवात गणेशमूर्तीवर उधळण करण्यासाठी संकेश्वरी चिरमुऱ्यांना मोठी मागणी असते. रविवार सार्वजनिक सुटी असल्याने अनेकांनी सहकुटुंब खरेदी व घरगुती गणेशमूर्ती नेल्या. सोमवारची गर्दी लक्षात घेता ३० टक्क्यांहून अधिक मूर्ती अनेक कुटुंबीयांनी नेल्या. यामध्ये दीड, अडीच दिवसांच्या गणेशमूर्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे पहाटे साडेतीन ते दुपारी दोनपर्यंत गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याची वेळ असल्याचे अनेक पुजाऱ्यांनी सांगितले. काही गणेश मंडळांनी आजची गर्दी लक्षात घेता बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली येथून रविवारी दुपारनंतर गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात केली. यामध्ये दिलबहार तालीम मंडळ,जय शिवराय, तिरंगा मित्रमंडळ आदीसह मंगळवार पेठेतील संभाजीनगर येथील छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, जंगी हुसेन तालीम मंडळ, बजापराव माने तालीम मंडळ, नृसिंह दोस्त मंडळ, पावडर गु्रप, सिद्धाळा गु्रप, अष्टविनायक तरुण मंडळ, आदी मंडळांचा समावेश होता. दरम्यान, परगावी नोकरीला असणाऱ्यांनी आपापले गाव गाठण्यासाठी एकीकडे बसस्थानकावर गर्दी केली; तर पुण्या-मुंबईकडे असणारे मूळ कोल्हापूरकरही मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. येणाऱ्या संपूर्ण आठवड्यात गणरायाचे वास्तव्य घरोघरी राहणार असल्याने त्याच्या तयारीत कुटुंबच्या कुटुंब रंगल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यक र्त्यांच्या धावपळीला तर अंत नसल्याचे दिसून आले. अंबाबाई मंदिरातील गणरायाचे आगमन ४कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मानाच्या गणेशमूर्तीचे रविवारी रात्री गरुड मंडपात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले. श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या या गणेशमूर्ती स्थापनेला १२६ वर्षे पूर्ण होत आहेत. ४रविवारी सायंकाळी पावणेसात वाजता पापाची तिकटी येथील मूर्तिकार महेश वडणगेकर यांच्या घरापासून गणेशमूर्तीची मिरवणूक सुरू झाली. मिरवणुकीच्या रथाचे पूजन भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी संजय बावडेकर, नंदू मराठे, गजानन नार्वेकर, वसंतराव पोवार, राजू जुगळे, रणजित मेवेकरी, तन्मय मेवेकरी, सागर बावडेकर, आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीचा रथ ओढण्यात आला. या मिरवणुकीच्या अग्रभागी सुप्रभात ब्रास बँडच्या पथकाने विविध धून सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली; तर जोडीला करवीर नाद ढोल-ताशा पथकाने विविध वाद्यांचे प्रकार सादर केले. हरितालिका पूजन उत्साहात ४भगवान शंकराचे प्रतीक म्हणून वाळूपासून साकारलेली शंकराची पिंडी, मागे पार्वतीची प्रतिमा, अभिषेक, बेल, पान, दूर्वा, धूप, दीप, आरती, नैवेद्य, हरितालिका व्रताच्या पुस्तकाचे वाचन अशा धार्मिक विधींनी रविवारी कुमारिका व सुवासिनींनी हरितालिकेचे पूजन केले. ४पाटावर वाळूपासून शंकराची पिंडी तयार केली जाते. शेजारी पार्वती आणि गणेशाची प्रतिमा ठेवली जाते आणि वस्त्रमाळ, अभिषेक, धूप, दीप, आरती, बेलपान चढवून हरितालिकेचे पूजन केले जाते. यानिमित्त दिवसभर व्रतस्थ राहून शंकराची आराधना केली जाते.