शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

गण गण गणात बोतेचा गजर -गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 8:10 PM

Gajanan Maharaj Temple Kolhapur- गण गण गणात बोतेचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक उपक्रमांनी शुक्रवारी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करत पादुकांची मिरवणूक जीपमधून काढण्यात आली.

ठळक मुद्देगण गण गणात बोतेचा गजर गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात

कोल्हापूर : गण गण गणात बोतेचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक उपक्रमांनी शुक्रवारी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करत पादुकांची मिरवणूक जीपमधून काढण्यात आली.महाद्वार रोडवरील गजानन महाराज मंदिरात गेल्या सात दिवसांपासून पारायण तसेच भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शु्क्रवारी पहाटे भागातील ज्येष्ठांच्या हस्ते श्रींस अभिषेक करण्यात आला. श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्यावतीने दरवर्षी भव्य पालखी काढली जाते यंदा मात्र कोरोनामुळे फुलांनी सजवलेल्या जीपच्या बोनेटवर महाराजांच्या पादुका ठेवून मिरवणूक काढण्यात आली.

बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई मंदिर, पापाची तिकटी, महापालिका, शिवाजी चौक, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिरामार्गे पुन्हा मंदिर परिसरात पालखीचे विसर्जन झाले. दुपारी भागातील मोजक्याच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब इंगवले, निशांत वाकडे, राहुल इंगवले, ऋषी इंगवले, प्रकाश मिठारी, मोहन पवार उपस्थित होते.महाद्वार रोडवरील गण गण गणात बोते भक्त मंडळाच्यावतीनेदेखील सकाळी मूर्तीस अभिषेक, आरती व पूजाविधी करण्यात आो. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष अमित माने, उपाध्यक्ष प्रदीप जरग, सचिव शिवनाथ पावसकर, खजानिस गणेश रेळेकर यांच्यासह भाविक व कार्यकर्ते उपस्थित होते. यासह कदमवाडी व पोवार कॉलनी पाचगांव येथील गजानन महाराज मंदिरांतही धार्मिक उपक्रम घेण्यात आले.

--

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजReligious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर