गडहिंग्लज रिंगरोडप्रश्नी लवकरच मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST2021-08-22T04:28:23+5:302021-08-22T04:28:23+5:30

सर्वपक्षीय गडहिंग्लज शहर रिंगरोड कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील विश्रामगृहात शनिवारी मुश्रीफ यांच्याशी याप्रश्नी सविस्तर चर्चा केली तसेच नगरविकासमंत्री ...

Gadhinglaj Ring Road issue meeting in Mumbai soon | गडहिंग्लज रिंगरोडप्रश्नी लवकरच मुंबईत बैठक

गडहिंग्लज रिंगरोडप्रश्नी लवकरच मुंबईत बैठक

सर्वपक्षीय गडहिंग्लज शहर रिंगरोड कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील विश्रामगृहात शनिवारी मुश्रीफ यांच्याशी याप्रश्नी सविस्तर चर्चा केली तसेच नगरविकासमंत्री व नगरपालिका पदाधिकारी,प्रशासनासोबत बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

चर्चेत प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर,नगरअभियंता सुधीर पोतदार,कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ.एम.एस.बेळगुद्री, सचिव चंद्रकांत सावंत, उपाध्यक्ष बसवराज आजरी, गुंड्या पाटील,किरण कदम आदींनी भाग घेतला.

शिष्टमंडळात बांधकाम सभापती राजेश बोरगावे, नगरसेवक बसवराज खणगावे, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापूर व हारुण सय्यद, राजशेखर यरटे,नागेश चौगुले, सिद्धार्थ बन्ने, सयाजी भोसले, रश्मीराज देसाई, महेश सलवादे, रमजान अत्तार, विरुपाक्ष पाटणे आदींचा समावेश होता.

--------

फोटो ओळी-

गडहिंग्लज येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना डॉ.एम.एस.बेळगुद्री यांनी निवेदन दिले.यावेळी गडहिंग्लज शहर रिंगरोड कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Gadhinglaj Ring Road issue meeting in Mumbai soon