शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दादांच्या ‘व्यूहरचने’कडे गडहिंग्लजकरांचे ‘लक्ष’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 23:54 IST

गडहिंग्लज पालिका निवडणूक : ‘शहापूरकर-चव्हाणां’च्या प्रवेशानंतरच हालचालींना गती

राम मगदूम - गडहिंग्लज -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कोण-कोणती व्यूहरचना आखतात, याकडेच राजकीय जाणकारांसह गडहिंग्लजमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.आमदार हसन मुश्रीफ यांच्या गडहिंग्लज साखर कारखान्यावरील वर्चस्वाला धक्का देण्याचा जोरदार प्रयत्न चंद्रकांतदादांनी कारखान्याच्या निवडणुकीत केला. त्यासाठी त्यांनी जनता दलाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे आणि डॉ. प्रकाश शहापूरकर या कारखान्याच्या दोन्ही माजी अध्यक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास यश आले नाही. त्यानंतर शिंदे-मुश्रीफ व शहापूरकर-चव्हाणांची युती झाली. त्याचवेळी त्यांनी ‘शहापूरकर-चव्हाण’ या जोडगोळीला ‘भाजप’मध्ये घेण्याचे ठरविले होते.दरम्यान, आठवड्यापूर्वी शहापूरकर व चव्हाण या दोघांनीही खास पत्रकार परिषद घेवून गडहिंग्लज शहर व तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसह तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘भाजप’मध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. रविवार (दि. ११) रोजी होणाऱ्या पक्षप्रवेश व शक्तीप्रदर्शनाची दोघांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानंतरच खऱ्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबत कुणा-कुणाचा प्रवेश होतो, याकडेच शहरासह जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. गतवेळी काय-काय झालं?जागा वाटप आणि उमेदवारीच्या नावावरून गतवेळी जनता दल आणि जनसुराज्य यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे दोन्ही बाजूने बंडखोरी झाली होती. ११ जागा लढविलेल्या जनता दलाला ७ जागा, तर ८ जागा लढविलेल्या जनसुराज्यला केवळ १ जागा मिळाली. १७ जागा लढविलेल्या राष्ट्रवादीला ९ जागा मिळाल्या. एकमेव निवडून आलेले ‘जनसुराज्य’चे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर सुरुवातीला राष्ट्रवादीबरोबर आणि त्यानंतर व आता जनता दलासोबत आहेत. शहापूरकर समर्थक प्रा. रमेश पाटील व दीपा बरगे हे दोघेही राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून ‘घड्याळ’ चिन्हावर लढले. पराभूत झालेल्या प्रा. पाटील यांची शहर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली, तर विजयी झालेल्या बरगे या ५ वर्षे राष्ट्रवादीसोबत राहिल्या.