कोल्हापूर-मिरज रेल्वे दुहेरीकरणासाठी ९८४ कोटींचा निधी मंजूर, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:07 IST2026-02-13T12:06:52+5:302026-02-13T12:07:12+5:30

सुमारे ४७ किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले

Funds of Rs 984 crore approved for doubling of Kolhapur Miraj railway, information from MP Dhananjay Mahadik | कोल्हापूर-मिरज रेल्वे दुहेरीकरणासाठी ९८४ कोटींचा निधी मंजूर, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर-मिरज रेल्वे दुहेरीकरणासाठी ९८४ कोटींचा निधी मंजूर, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ९८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. यामुळे कोल्हापूरच्या रेल्वे विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग एकेरी आहे. त्यामुळे नव्या गाड्या कोल्हापुरातून सुरू करणे तसेच रेल्वे गाड्यांचे क्रॉसिंग याला मर्यादा येतात. त्यामुळे कोल्हापूर ते मिरज या सत्तेचाळीस किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण व्हावे ही कोल्हापूरकरांची प्रदीर्घकाळची मागणी आहे. आता हा निधी मंजूर झाल्यामुळे कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.
 
सुमारे ४७ किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. एकदा का कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले की अनेक लांब पल्ल्याच्या नव्या रेल्वे गाड्या कोल्हापुरातून सुरू होऊ शकतील. शिवाय ‘वंदे भारत’सारख्या नव्या आलिशान रेल्वे गाड्या कोल्हापूरला मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही ते म्हणाले. महाडिक यांना याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title : कोल्हापुर-मिराज रेल दोहरीकरण परियोजना को ₹984 करोड़ की स्वीकृति

Web Summary : सांसद धनंजय महाडिक ने घोषणा की कि कोल्हापुर-मिराज रेल दोहरीकरण के लिए ₹984 करोड़ स्वीकृत किए गए हैं। इससे कोल्हापुर के रेल विकास को बढ़ावा मिलेगा, नई ट्रेनें और 'वंदे भारत' सेवाएं शुरू हो सकेंगी। 47 किलोमीटर की दोहरीकरण परियोजना लंबे समय से लंबित मांगों को पूरा करेगी, सर्वेक्षण का काम पूरा हो गया है।

Web Title : Kolhapur-Miraj Railway Doubling Project Gets ₹984 Crore Boost

Web Summary : ₹984 crore has been sanctioned for the Kolhapur-Miraj railway doubling, announced MP Dhananjay Mahadik. This will boost Kolhapur's rail development, enabling new trains and 'Vande Bharat' services. The 47-kilometer doubling project addresses long-standing demands, with survey work completed.