वाळवा तालुक्यातील फरार गुन्हेगारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 20:46 IST2019-03-30T20:44:54+5:302019-03-30T20:46:39+5:30
पुणे, पाचगणी, कºहाड, शाहूपुरी पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरार गुन्हेगारास शाहूवाडी उपविभागीय पोलीस पथकाने शनिवारी कोडोली (ता. पन्हाळा) येथे रंगेहात पकडले. संशयित अकबर मुबारक मुल्ला

पुणे, पाचगणी, कºहाड, शाहूपुरी पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरार गुन्हेगार अकबर मुल्ला याला शनिवारी शाहूवाडी उपविभागीय पोलीस पथकाने अटक केली.
कोल्हापूर : पुणे, पाचगणी, कºहाड, शाहूपुरी पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरार गुन्हेगारास शाहूवाडी उपविभागीय पोलीस पथकाने शनिवारी कोडोली (ता. पन्हाळा) येथे रंगेहात पकडले. संशयित अकबर मुबारक मुल्ला (वय ३५, रा. किल्ले मच्छिंद्री, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, संशयित अकबर मुल्ला हा अनेक वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्'ांत गुन्हे दाखल होते. किल्ले मच्छिंद्री येथील घराची अनेकवेळा झडती घेतली असता तो सापडला नव्हता. त्याच्या पै-पाहुण्यांकडेही शोध घेतला होता. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांना खबऱ्याकडून संशयित मुल्ला कोडोली येथील एका हायस्कूल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक ए. एस. गुरव, कॉन्स्टेबल व्ही. एस. सुतार, एस. एस. पाटील, डी. टी. पोळ, यु. बी. काटकर, पी. एस. यादव यांनी सापळा रचून त्याला अटक केली.