शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चा आजरा कारखान्यावर मोर्चा

By admin | Updated: July 12, 2014 00:43 IST

संचालक व संघटनेची एकत्रित बैठक घेण्याचा निर्णय

आजरा : सन २०१३-१४ सालाकरिता आजरा साखर कारखान्यातून गाळप झालेल्या ऊसास दुसरी उचल प्रतिटन ५०० रूपयाप्रमाणे मिळावी यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीने राजेंद्र गड्यान्नावर व तानाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली आजरा साखर कारखान्यावर मोर्चा काढला. अध्यक्ष विष्णूपंत केसरकर, संचालक मंडळ व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर स्वाभिमानीचे आंदोलन संपुष्टात आले.दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानीचे कार्यकर्ते कारखाना कार्यस्थळी घोषणाबाजी करीत दाखल झाले. यावेळी अध्यक्ष केसरकर यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले.चर्चेदरम्यान गड्यान्नावर म्हणाले, खास. राजू शेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारला साखर उद्योगाबाबत सकारात्मक पावले उचलावी लागली आहेत. केवळ ऊस उत्पादक नव्हेच तर साखर कारखानदारांच्या बाजूनेही केंद्र सरकारला निर्णय घेणे भाग पडले.आजरा साखर कारखान्यातील सत्तेत स्वाभिमानी घटक पक्ष असला तरीही स्वाभिमानी बऱ्याच गोष्टीपासून अनभिज्ञ आहे. वारणा-आजरा हिशेबाचे घोंगडे अद्याप भिजतच आहे. संचालक मंडळाला गांभीर्य नाही. भविष्यात अनेक अडचणींशी कारखान्याला सामना करावा लागणार आहे. याचेही भानही संचालक मंडळाने ठेवावे. ५०० रूपयांची दुसरी उचल मिळावी यावर संघटना ठाम आहे.संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी देसाई म्हणाले, कारखान्याचा कारभार पारदर्शी असावा यासाठी संघटना आग्रही आहे. सरकारकडून कारखान्याला किती पॅकेल मिळाले ? त्याचा विनीयोग कसा केला ? याची माहिती संचालक मंडळाने स्पष्ट करावी.अशोक चराटी म्हणाले, काटकसरीने कारभार करून कारखान सुस्थितीत आणला आहे. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य हे उज्वल आहे. कारखान्याची सध्याची आर्थिक स्थिती विचारात घेवून दुसऱ्या उचलीबाबत शंभर रूपयांची उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही स्पष्ट केले.अध्यक्ष केसरकर म्हणाले, शेतकरी संघटना व कारखान्याचे संचालक यात कांही अंतर नाही. संघटनेने केंव्हाही येवून कारखान्याच्या कारभाराची, खर्चाची ताळेबंदाची माहिती घ्यावी, याकरिता स्वाभिमानीने तारीख द्यावी त्या दिवशी बैठक घेतली जाईल असेही स्पष्ट केले.चर्चेत उपाध्यक्ष मारूती घोरपडे, संचालक अबुताहेर तकिलदार, बी. टी. जाधव, नितीन पाटील, आप्पासाहेब देसाई, कृष्णा पाटील, सखाराम केसरकर, कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)