हातकणंगले : सोशल मीडियावर झाली मैत्री. मैत्रीचे रूपांतर झाले प्रेमात आणि हातकणंगले येथील चौदा वर्षीय अल्पवयीन युवतीने घर आई-वडील सोडून थेट प्रियकराच्या उत्तर प्रदेश येथील रायबरेलीची धरली वाट. या घटनेने सकाळी शहरात खळबळ उडाली. सोमवारी पहाटे अल्पवयीन युवती घरच्यांना कोणतीही माहिती नसताना घरातून बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिस, एलसीबी आणि रेल्वे पोलिसानी यंत्रणा कामाला लावली आणि बेपत्ता मुलगी आठ तासात लोणंद येथे ताब्यात घेऊन कुटुंबाकडे सुपूर्द केले.हातकणंगले येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील चौदा वर्षीय अल्पवयीन युवती शहरातीलच एका शाळेमध्ये शिक्षण घेत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची उत्तर प्रदेश येथील रायबरेलीतील एका युवकाशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रियकराच्या शोधासाठी ती सोमवारी सकाळी रायबरेलीकडे निघाली.
वाचा : इन्स्टाग्रामवरून मुलींना करायचा ब्लॅकमेल, पुण्यातील हॉटेलमधून संशयिताला ताब्यात घेतलं, पण.. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ सातारा पोलिस व रेल्वे पोलिस यांनी कोयना एक्स्प्रेसमधील प्रत्येक डब्यात शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. अखेर रेल्वे लोणंद स्थानकावर पोहोचली असता संबंधित युवती मिळून आली.
तिला पोलिसांना सुखरूप ताब्यात घेतले. हातकणंगले पोलिसांना कळवले. संबंधित युवतीला ताब्यात घेण्यासाठी हातकणंगले पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ लोणंदकडे रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे.
Web Summary : A 14-year-old girl from Hatkanangale ran away to Uttar Pradesh to meet her online lover. Police swiftly located her in Lonand and safely returned her to her family, preventing a potential tragedy.
Web Summary : हातकणंगले की 14 वर्षीय लड़की सोशल मीडिया पर हुए प्यार के चलते उत्तर प्रदेश भाग गई। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए उसे लोणंद में ढूंढ निकाला और सुरक्षित रूप से उसके परिवार को सौंप दिया, जिससे एक संभावित त्रासदी टल गई।