महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे पंचगंगा रुग्णालयात मोफत जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST2021-07-11T04:17:28+5:302021-07-11T04:17:28+5:30

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील पंचगंगा रुग्णालयातील प्रसूती विभागातील रुग्णांच्या नातेवाइकांना ...

Free meal at Panchganga Hospital by Mahalakshmi Annachhatra | महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे पंचगंगा रुग्णालयात मोफत जेवण

महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे पंचगंगा रुग्णालयात मोफत जेवण

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील पंचगंगा रुग्णालयातील प्रसूती विभागातील रुग्णांच्या नातेवाइकांना रोज मोफत जेवण देण्यात येत आहे. शुक्रवारी या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

हा उपक्रम वर्षभर सुरू राहणार असून त्यामध्ये २ चपात्या, भाजी, भात, आमटी, खरडा किंवा लोणचे असे शुद्ध सात्त्विक पदार्थ असणार आहेत. या उपक्रमाचे रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांनी कौतुक करून दुपारच्या भोजनाची उत्तम व्यवस्था झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी रुग्णालयातील प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी विद्या काळे व दत्तात्रय कुंभार यांचे सहकार्य लाभले. यावेळी अध्यक्ष राजू मेवेकरी, एस. के. कुलकर्णी, राजेश सुगंधी, किशोर घाटगे, तन्मय मेवेकरी, विराज कुलकर्णी, प्रशांत तहसीलदार, आदित्य मेवेकरी, सचिन पाटील, आशिष पाटील, प्रतीक गुरव उपस्थित होते.

--

फोटो नं १००७२०२१-कोल-पंचगंगा हॉस्पीटल

ओळ : श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे शुक्रवारपासून पंचगंगा रुग्णालयातील प्रसूती विभागातील रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

--

Web Title: Free meal at Panchganga Hospital by Mahalakshmi Annachhatra