शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे मातरम्'ला चार नामांकन

By admin | Updated: August 25, 2014 23:11 IST

सुनील माने कॉमेडी अवॉर्डने सन्मानिते

कोल्हापूर : कोल्हापुराच्या नाट्यचळवळीत सातत्याने नवनवीन प्रयोग सादर करीत रसिकांना दर्जेदार नाटकांचा आस्वाद देणाऱ्या काळम्मावाडी येथील श्री हनुमान तरुण मंडळाच्या ‘वंदे मातरम् अर्थात गोंधळ मांडियेला’ या नाटकाला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड या स्पर्धेत चार नामांकने मिळाली आहेत, तर नाटकाचे लेखक सुनील माने यांना उत्कृष्ट संहिता लेखनासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘झी मराठी’च्या वतीने झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड या व्यावसायिक विनोदी नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील नामांकित नाट्यसंस्थांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत काळम्मावाडीच्या वंदे मातरम् अर्थात गोंधळ मांडियेला या नाटकाची अंतिम तीन नाटकांत निवड झाली, तर लेखक सुनील माने यांना संहिता लेखनासाठी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला.  उत्कृष्ट प्रयोग, उत्कृष्ट संहिता, उत्कृष्ट सहायक अभिनेता, उत्कृष्ट सहायक अभिनेत्री अशी चार नामांकने या नाटकाला मिळाली. गतवर्षी कोल्हापुरात झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेतही या नाटकाने बक्षिसांची लयलूट केली होती. अभिनय कलेची आवड असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी मिळून स्थापन केलेल्या या नाट्यसंस्थेने निर्माण केलेले पहिले नाटक म्हणजे धरणाखालच्या अंधारातून. कथा नामा जोग्याची, सासू ४२० अशा विविध प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांद्वारे या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेसह व्यावसायिक रंगभूमीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. सुनील माने यांनी विविध नाटकांसह चित्रपटांसाठी पटकथा व संवाद लेखन केले आहे. (प्रतिनिधी)