एक्स्प्रेस वेवर ट्रक-कारच्या अपघातात पुण्याचे चार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 00:29 IST2019-01-05T00:29:01+5:302019-01-05T00:29:34+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ ट्रक आणि दोन कारच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला.

एक्स्प्रेस वेवर ट्रक-कारच्या अपघातात पुण्याचे चार ठार
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ ट्रक आणि दोन कारच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट घेऊन चाललेला ट्रक आडोशी बोगदा पास झाल्यावर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व ट्रक मुंबई लेनवरून पुणे लेनमध्ये घुसला आणि उलटला. त्यामुळे झालेल्या भीषण अपघात घडला. ट्रकमध्ये सिमेंटच्या बॅगा भरल्या होत्या. अपघातानंतर सिमेंट रस्त्यावर पसरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद होती. बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी वाहतूक सुरळीत होण्यास मदत केली.
दोन कारचे मोठे नुकसान
सिमेंट घेऊन चाललेल्या ट्रकचे नियंत्रण सुटून पुणे लेनमध्ये घुसला आणि उलटला. ट्रकच्या धडकेने एक कार १०० फूट खोल दरीत कोसळली, तर एक कार ट्रकखाली सापडल्याने तिचा चक्काचूर झाला.
भीषण अपघातात निकिता आंग्रे (२६ रा. पुणे), चित्रा आंग्रे (५९, रा. पुणे), मृणाली पुणेकर(६५, रा. पुणे) व अन्य १ जण असा चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले . यातील अविनाश आंग्रे हे गंभीर असून, त्यांना वाशीतील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.