सदरबाजार मारहाण प्रकरणी चौघे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 20:19 IST2021-05-11T20:18:21+5:302021-05-11T20:19:03+5:30
Crimenews Kolhapur : सदरबाजार येथे पूर्ववैमनस्यातून दोघा सख्ख्या भावांवर बॅट व दगडाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी मंगळवारी चौघांना अटक केली.

सदरबाजार मारहाण प्रकरणी चौघे अटक
कोल्हापूर : सदरबाजार येथे पूर्ववैमनस्यातून दोघा सख्ख्या भावांवर बॅट व दगडाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी मंगळवारी चौघांना अटक केली.
राहुल उर्फ सोनू सूर्यवंशी (वय २१ रा. विचारेमळा), अनिकेत अमर सूर्यवंशी (१८ सदरबाजार), आदित्य उर्फ गब्बर अमर सूर्यवंशी (२१ रा. केव्हीएस पार्क, नागाळा पार्क), अक्षय रामा लोखंडे (२७ रा. सदरबाजार हौसिंग सोसायटी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर सुहासिनी अमर सूर्यवंशी (रा. सदरबाजार) याच्यावर गुन्हा नोंद आहे.
सदरबाजार येथे रविवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून संजय विनोद भंडारे यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केला, त्याला क्रिकेटच्या बॅटने व दगडाने मारहाण केली. त्याबाबत जाब विचारण्यासाठी त्याचा भाऊ निखिल विनोद भंडारे हे गेले असता त्यालाही बॅटने मारहाण केली. दोघांनाही ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात बॅटने प्रहार करुन ते गंभीर जखमी झाले होते.
याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात सोनू सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी, गब्बर सूर्यवंशी, अक्षय लोखंडे, सुहासिनी अमर सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली. याबाबत योगेश विनोद भंडारे यांनी पोलिसात तक्रार दिली.