अनोख्या सत्काराने भारावले उंदरवाडीतील माजी कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST2021-09-02T04:52:49+5:302021-09-02T04:52:49+5:30

आपल्या कार्यकाळातील कामाची दखल घेत ग्रामपंचायतीने केलेल्या सत्काराने हे माजी ‘गावकारभारी’ काही काळ भारावून गेले. उंदरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने या माजी ...

The former steward of Undarwadi was overwhelmed with unique hospitality | अनोख्या सत्काराने भारावले उंदरवाडीतील माजी कारभारी

अनोख्या सत्काराने भारावले उंदरवाडीतील माजी कारभारी

आपल्या कार्यकाळातील कामाची दखल घेत ग्रामपंचायतीने केलेल्या सत्काराने हे माजी ‘गावकारभारी’ काही काळ भारावून गेले.

उंदरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने या माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यमान सरपंच भारती संजय पाटील यांना बेळगावच्या नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार मिळालेबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय राजेंद्र पाटील, बी. एस. पोवार, गावातील पहिल्या महिला डॉक्टर प्रियांका पाटील, दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांसह कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक मसू पाटील, विष्णू बोडके, सुकुमार पाटील, विजय पाटील, संजय पाटील, मारुती पाटील, दत्तात्रय पाटील, आकाराम पाटील, एस. व्ही. पाटील, मारुती हरी पाटील, विठ्ठल पाटील, दत्तात्रय ढेरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य उपस्थित होते. स्वागत संदीप पाटील यांनी केले. प्रास्ताविक बी. बी. पाटील यांनी केले तर आभार उपसरपंच संजीवनी पाटील यांनी मानले.

फोटो ओळी - उंदरवाडी (ता. कागल) येथे स्थापनेपासूनच्या माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आला. (छाया : सुमंत फोटो, उंदरवाडी)

Web Title: The former steward of Undarwadi was overwhelmed with unique hospitality