शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गडहिंग्लज’च्या स्वाती कोरी जाणार भाजपमध्ये; महाराष्ट्रातील एकमेव आणि शेवटचा बालेकिल्ला असणाऱ्या जनता दलाचे अस्तित्व संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:00 IST

रविवारी प्रवेश : चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती

राम मगदूमगडहिंग्लज : जनता दलाचे माजी आमदार दिवंगत ॲड. श्रीपतराव शिंदे यांची कन्या, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचे समजते.रविवारी (दि. २५) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ आणि प्रा.कोरी यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने भाजपकडून शक्तिप्रदर्शनाची शक्यता आहे. येथील सूर्या सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम होणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी नुकतीच जनता दलाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी प्राप्त परिस्थितीत करावा लागणारा संघर्ष विचारात घेऊन प्रा.कोरींनी थेट भाजपमध्ये प्रवेश करावा,असा आग्रह बहुतेक कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊया, असे त्यांनी सांगितले होते. त्याच वेळी त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळाले.दरम्यान, त्यांनी आपल्या पक्षातील वडिलधाऱ्यांसह संबंधित सर्वांशी विचारविनिमय केला. त्यानंतर मंत्री पाटील,आमदार पाटील यांच्याशीही चर्चा केली.भाजप प्रवेशानंतर प्रा.कोरी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताकद देण्याची ग्वाही दिल्यामुळेच त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे समजते.

प्रा.कोरी यांची राजकीय वाटचाल२००६ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीतून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर दोनवेळा नगराध्यक्षपद भूषवले. दरम्यान, गडहिंग्लज कारखान्याच्या संचालिका म्हणूनही काम पाहिले. १५ वर्षे गडहिंग्लज कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या अध्यक्षा आणि श्रीपतराव शिंदे शिक्षणसमूहाच्या सचिव म्हणून काम पाहत आहेत.

‘जद’चे अस्तित्व संपणार!जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपसोबत युती केली तरी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेले ॲड. शिंदे हे अखेरपर्यंत समाजवादी विचारांशी एकनिष्ठ राहिले. मात्र,त्यांच्या कन्या प्रा. कोरींनी केवळ अपरिहार्यता म्हणूनच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनता दलाचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. किंबहुना, महाराष्ट्रातील एकमेव आणि शेवटचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडहिंग्लजची ओळखही इतिहासजमा होणार आहे.केवळ औपचारिकता बाकी!बुधवारी(२१) निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जनता दलाच्या तीन कार्यकर्त्यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे प्रा. कोरी यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून, केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Swati Kore joins BJP, Janata Dal's bastion collapses.

Web Summary : Swati Kore, daughter of ex-MLA Shripatrao Shinde, is joining BJP. This move threatens the existence of the Janata Dal in Kolhapur, its last stronghold in Maharashtra. Her entry follows worker pressure and promises of support from BJP leaders.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५BJPभाजपा