शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: July 18, 2015 00:18 IST

इचलकरंजीतील घटना : दोन गटांत मारामारी

इचलकरंजी : वादग्रस्त जागेतील मुरूम भरण्याच्या कारणावरून येथील जवाहरनगरात दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. यामध्ये माजी नगरसेवक जहॉँगीर गणी पटेकरी (वय ४४) यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला, तर विरोधी गटातील महादेव शंकर सूर्यवंशी (५१) यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. दरम्यान, सूर्यवंशी यांच्या घरावर दगडफेक व बुरूड व्यवसायासाठी आणलेले बांबू पेटवून दिले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. शिवाजीनगर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.पटेकरी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सूर्यवंशी यांनी पालिकेच्या जागेत अतिक्रमण करून बांबू ठेवले होते. हे अतिक्रमण पटेकरी नगरसेवक असताना त्यांनी काढले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाद-विवाद होते. गुरुवारी सायंकाळी मोकळ्या जागेत ठेवलेला मुरूम भरून नेताना सूर्यवंशी यांनी अडवणूक केली. याचा जाब विचारण्यासाठी पटेकरी गेले असता तुला आता सोडत नाही, असे म्हणून कोयत्याने डोक्यात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पटेकरी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सूर्यवंशी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, घराशेजारच्या जागेत शेजाऱ्यांच्या संमतीने वासे व बांबू ठेवले होते. येथील मुरूम गुरुवारी सायंकाळी भरून नेताना अडवणूक केल्याचा जाब विचारण्यासाठी पटेकरी यांच्यासह कार्यकर्ते सद्दाम पटेकरी, सचिन बिरांजे, सुतार, सचिन सावंत, अनिल चौगुले, प्रशांत निकम, राहुल पिरगोने, त्यांची मुले व इतर सात ते आठजण सूर्यवंशी यांच्या घरी गेले. यावेळी ‘काल झालेल्या वादात तुम्ही मला शिवीगाळ का केली, मी तुम्हाला येथे ठेवत नाही. तुमचा धंदाच बंद करतो’, असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली. तेथून सूर्यवंशी व त्यांचा मुलगा अविनाश, अवधूत हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. यावेळी शाहू पुतळ्याजवळ सात ते आठजणांनी त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगडाने डोक्यात मारले. यामध्ये सूर्यवंशी यांना डोक्याला व डाव्या हाताला मार लागला आहे. सूर्यवंशी यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले होते. (वार्ताहर)